मानसिक आरोग्यासाठी ‘डान्स’ अत्यंत फायदेशीर, मिळतील 4 जबरदस्त फायदे

International Dance Day 2024 : आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस दर वर्षी 29 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. संपूर्ण जगभरात डान्स डे मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात येतो.. आज देखील सर्वत्र फक्त आणि फक्त आंतरराष्ट्रीय नृत्य दिवसाच्या चर्चा रंगल्या आहेत.

मानसिक आरोग्यासाठी 'डान्स' अत्यंत फायदेशीर, मिळतील 4 जबरदस्त फायदे
Follow us
| Updated on: Apr 29, 2024 | 11:08 AM

आज संपूर्ण जगात डान्समय वातावरण आहे. त्यामागे कारण देखील खास आहे. आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस असल्यामुळे डान्स प्रेमींमध्ये आनंद आणि उत्साहाचं वातावरण आहे. दर वर्षी आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस 29 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. भारतात अनेक नृत्य प्रकार आहेत. लावणी, भरतनाट्यम, कथक, बॉलिवूड डान्स, वेस्टर्न डान्स… असे अनेक डान्सचे प्रकार आहेत. अनेक जण आवड म्हणून डान्स करतात. पण डान्स करण्याचे अनेक फायदे देखील आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

डान्स आपल्याला आवडतो म्हणून आपण करतो, पण त्याचे फायदे देखील फार लाभदायक आहेत. धकाधकीच्या जीवनात निर्माण होणाऱ्या चिंता आणि तणावापासून आराम मिळतो. मानसिक आरोग्यासाठी नृत्याचे काही आश्चर्यकारक फायदे जाणून घेऊ…

डान्स केल्यामुळे शारीरात एंडोर्फिन सारखे आनंदी हार्मोन्स तयार होतात. ज्यामुळे चिंता, ताणव पासून मुक्ती मिळते आणि मूड फ्रेश राहतो. जर तुम्ही रोज काही वेळ डान्ससाठी देत असाल तर, धकाधकीच्या जीवनात निर्माण होणाऱ्या चिंता आणि तणावापासून आराम मिळेल.

कोणत्या गोष्टीमुळे निराश असाल तर, आवडीच्या गाण्यावर डान्स केल्यास मन हलकं होतं. तुम्ही कोणत्याही वयात डान्स करु शकता. आवड जपण्यासाठी आणि कायम आनंदी राहण्यासाठी वयाची गरज नसते. काही बंधन आपणच आपल्यावर घालून घेत असतो.

डान्स केल्यामुळे तुमच्यातील आत्मविश्वास देखील वाढतो. वेग-वेगळ्या प्रकारच्या नृत्याचं तुम्ही प्रशिक्षण घेता. त्यानंतर चार लोकांमध्ये कौतुक झाल्यानंतर तुमचा तुमच्या असलेल्या विश्वास वाढतो.. यामुळे तुम्हाला स्वतःला प्रचंड आनंद होतो…

नातं कोणतंही असो, त्यामध्ये प्रेम आणि काळजी वाढण्यासाठी डोकं शातं आणि हेल्दी राहणं फार महत्त्वाचं असतं. डान्स केल्याने शारीरत आनंदी हार्मोन्स तयार होतात. ज्यामुळे उत्साह वाढतो. सतत होणारी चीडचीड देखील होत नाही. असं असल्यास इतरांना देखील तुमच्यासोबत वेळ व्यतीत करायला आवडतो.

भारतात अनेक प्रकारचे डान्स प्रकार आहेत. भारतात शास्त्रीय नृत्याचं प्रशिक्षण घेणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे. नृत्यामुळे आपण स्वतःला वेळ देऊ शकतो. ज्यामुळे आपल्या झालेले बदल आपल्याला जाणवतात. सांगायचं झालं तर, झगमगत्या विश्वात देखील अनेक सेलिब्रिटी डान्सर आहेत.

सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.