International Men’s Day 2024: पुरुषांनो वेळीच व्हा सावध! अन्यथा होतील ‘हे’ गंभीर आजार
International Men's Day 2024: आज आंतरराष्ट्रीय पुरुष दिन आहे. त्यानिमित्त आम्ही पुरुषांना होणाऱ्या 6 आजारांबद्दल माहिती देणार आहोत. वेळीच आपल्या जीवनशैलीत काही आवश्यक बदल केल्यास तुम्ही या 6 आजारांपासून दूर राहू शकतात.
International Men’s Day 2024: आज आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो. या दिनानिमित्त आम्ही तुम्हाला एका गंभीर समस्येकडे घेऊन जात आहोत. चिंता करण्याचं काही कारण नाही. आम्ही फक्त सावध करत आहोत. पुरुषांना असे काही आजार असतात, ज्यामुळे मोठी समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे वेळीच खबरदारी घेणं गरजेचं आहे. पुरुषांना होणाऱ्या 6 आजारांविषयी जाणून घ्या.
जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयीमुळे आज पुरुष अनेक गंभीर आजारांना बळी पडत आहेत. बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि दिवसेंदिवस वाढत चाललेला ताण यामुळे पुरुषांचे आरोग्य कसे धोक्यात आले आहे, हे जाणून घेऊया.
पुरुषांमध्ये झपाट्याने वाढणारे आजार कोणते?
हृदयरोग: हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक हे पुरुषांच्या मृत्यूचे सर्वात सामान्य कारण आहे. अस्वास्थ्य खाण्यापिण्याच्या सवयी, धूम्रपान आणि शारीरिक हालचालींचा अभाव ही मुख्य कारणे आहेत.
मधुमेह: पुरुषांमध्ये टाईप 2 मधुमेह झपाट्याने वाढत आहे. अनुवंशिकता व्यतिरिक्त लठ्ठपणा आणि शारीरिक हालचालींचा अभाव हे देखील एक मुख्य कारण आहे. अनेक लोक कार्यालयात कामाला एकदा बसले की उठत नाही. त्यामुळे हे टाळू जमेल तशा शारीरिक हलचाली करणं गरजेचं आहे.
कर्करोग: प्रोस्टेट कर्करोग हा पुरुषांमध्ये सर्वात सामान्य कर्करोग आहे. याशिवाय फुफ्फुसाचा कर्करोग, कोलन कॅन्सर आणि यकृताचा कर्करोगही आज पुरुषांवर गंभीर परिणाम करत आहे.
मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या: नैराश्य, चिंता आणि मानसिक आरोग्याशी संबंधित इतर समस्याही पुरुषांमध्ये सामान्य होत आहेत. कामाचा ताण, कौटुंबिक समस्या आणि सामाजिक अपेक्षा ही प्रमुख कारणे आहेत.
लैंगिक आरोग्याच्या समस्या: इरेक्टाइल डिसफंक्शन, शीघ्रपतन आणि लैंगिक आरोग्याशी संबंधित इतर समस्या केवळ पुरुषांच्या आरोग्यावरच नव्हे तर आत्मविश्वासावरदेखील परिणाम करतात. याशिवाय काही प्रकरणांमध्ये या समस्यांमुळे वैवाहिक संबंधही बिघडतात.
पुरुषांना जास्त धोका का असतो?
अस्वास्थ्य खाण्याच्या सवयी: जंक फूड, अल्कोहोल आणि तंबाखूच्या सेवनाने हृदयरोग, लठ्ठपणा आणि कॅन्सरसारख्या आजारांचा धोका वाढतो.
शारीरिक हालचालींचा अभाव: लठ्ठपणा, हृदयरोग आणि मधुमेहामागे शारीरिक हालचालींचा अभाव हे प्रमुख कारण असू शकते.
ताणतणाव: कामाचा ताण, कौटुंबिक समस्या आणि मानसिक आरोग्याच्या समस्याही या आजारांना प्रोत्साहन देतात.
धूम्रपान: हृदयाशी संबंधित आजार, फुफ्फुसांचा कर्करोग आणि अशा अनेक आजारांमागे धूम्रपान हे देखील एक प्रमुख कारण आहे.
लठ्ठपणा: हृदयरोग, मधुमेह आणि कॅन्सर सारख्या अनेक आजारांचा धोका वाढवण्यात लठ्ठपणाही महत्त्वाची भूमिका बजावतो.
आम्ही पुरुषांना होणाऱ्या 6 आजारांबद्दल माहिती दिली आहे. वेळीच आपल्या जीवनशैलीत काही आवश्यक बदल केल्यास तुम्ही या 6 आजारांपासून दूर राहू शकतात.
(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)