IRCTC चं टूर पॅकेज; नेपाळ-काठमांडूची अविस्मरणीय सफर, थ्री-स्टार सुविधा
निसर्गाचं वरदान लाभलेलं नेपाळ जगप्रसिद्ध पर्यटन स्थळांसाठी ओळखल जातं. आयआरटीसी टूर पॅकेज मधील रेल्वेमधून नेपाळ भ्रमण करता येणार आहे.
नवी दिल्ली : तुम्हाला प्रवासाची आवड आहे का? भारतीय रेल्वेनं (Indian Railway) किफायतशीर दरांत टूर पॅकेजची घोषणा केली आहे. भारतीय रेल्वेची उप-कंपनी आयआरटीसीनं बंपर पॅकेजची घोषणा केली आहे. या पॅकेजमधून नेपाळची सफर (Nepal Tour Package) करता येणार आहे. या टूर पॅकेजच्या सहाय्यानं नेपाळची राजधानी काठमांडू आणि पोखरी सारख्या नयमरम्य ठिकाणी प्रवास करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. निसर्गाचं वरदान लाभलेलं नेपाळ जगप्रसिद्ध पर्यटन स्थळांसाठी ओळखल जातं. आयआरटीसी टूर पॅकेज मधील रेल्वेमधून नेपाळ भ्रमण करता येणार आहे. तुम्ही पशुपति नाथ मंदिराबद्दल (Pasupatinath Temple) ऐकलं असेल. टूर पॅकेजमध्ये जगप्रसिद्ध धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी उपलब्ध होणार आहे. आयआरटीसीनं पॅकेजची किंमत 31,500 रुपये निश्चित केली आहे. या पॅकेजमध्ये सर्व प्रकारचा खर्च समाविष्ट आहे.
सफर नेपाळची
आयआरटीसीच्या टूर पॅकेजमध्ये काठमांडू, पोखरा, पशुपतिनाथ मंदिर, पाटण दरबार स्क्वेअर, स्वयंभूनाथ स्तूप आणि मनोकामना मंदिरांना भेटींचा समावेश आहे. आयआरटीसीनं संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार टूर पॅकेज 5 रात्री व 6 दिवसांचे असणार आहे. बेस्ट ऑफ नेपाळ नावाच्या पॅकेजची वैशिष्ट्ये आयआरटीसीच्या वेबसाईटवर पाहायला मिळतील. टूर पॅकेजमध्ये तिकिट घेणाऱ्या प्रवासी दिल्लीवरुन विमानानं उड्डाण करतील. विमानाचे तिकीट पॅकेजमध्येच समाविष्ट असणार आहेत. आयआरटीसी द्वारे तिकीटांचा खर्च अदा केला जाईल. दिल्लीवरुन विमामानं काठमांडूला पाठविलं जाईल. काठमांडूत एक रात्रीसाठी निवासाची व्यवस्था असेल आणि त्यानंतर काठमांडू दर्शनाची संधी प्राप्त होईल.
सहलीचा प्लॅन
सहलीच्या दुसऱ्या दिवशी काठमांडूवरुन पोखराला जाण्याचं नियोजन असेल. दिवसभर पोखरा येथील स्थळांची भ्रमंती आणि रात्री मुक्काम असा दिनक्रम असेल. पोखराचं सूर्योद्य पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक भेट देतात. पोखरा भ्रमंती झाल्यानंतर प्रवासी काठमांडूच्या दिशेनं प्रयाण करतील. पुन्हा काठमांडूची भ्रमंती करण्याची संधी मिळले. आणि सहलीच्या सहाव्या दिवशी काठमांडूवरुन दिल्लीला परतावे लागेल. संपूर्ण सहलीचं पॅकेज 5रात्री व 6 दिवसांचे असणार आहे.
थ्री-स्टार सुविधा
सहलीच्या पॅकेजमध्ये प्रवाशांना थ्री-स्टार हॉटेलमध्ये निवासाची संधी उपलब्ध होणार आहे. सहलीतील पाच रात्रींपैकी तीन रात्री काठमांडू व दोन रात्री पोखरात असतील. हॉटेल वरुन दर्शनीय स्थळांना भेटी देण्यासाठी आयआरटीसीद्वारे बससेवा असणार आहे. यासोबतच माहितीसाठी गाईड उपलब्ध असेल. प्रत्येक ठिकाणीची माहिती यात्रेकरुंना दिली जाईल. सहलीच्या पॅकेजमध्ये हवाई यात्रेचे भाडे, निवास आणि भोजन व नाश्ताचा खर्च समाविष्ट आहे.