ख्रिसमस सुट्ट्यांसाठी IRCTC ने लाँच केलं असं टूर पॅकेज, जाणून घ्या एका क्लिकवर
IRCTC Tour Package: इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझ्म कॉर्पोरेशन म्हणजेच आयआरसीटीसीने एक जबरदस्त प्लान आणला आहे. ख्रिसमस सुट्ट्यांमध्ये तुमची फिरायला जाण्याची इच्छा असेल तर हा प्लान तुमच्या कामाचा आहे. हा टूर नेमका कधी आहे आणि किती खर्च येईल ते जाणून घ्या.
सलग सुट्ट्या लागला की फिरण्याची ओढ लागते, मग प्रत्येकजण स्वस्त आणि मस्त प्लानच्या शोधात असतो. जर तुम्हालाही फिरण्याची ओढ असेल आणि स्वस्त आणि मस्त प्लानच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आयआरसीटीसीने असाच एक प्लान आखला आहे. खास ख्रिसमस सुट्ट्यांसाठी हा प्लान आखला आहेत. या ख्रिसमस टूर पॅकेजची सुरुवात ख्रिसमसच्या एक दिवस आधी म्हणजेच 24 डिसेंबरपासून होणार आहे. यासाठी आयआरसीटीसीने एक प्लान जाहीर केला आहे. आयआरसीटीसीने अधिकृत खात्यावरून ही माहिती दिली आहे. हे टूर पॅकेज 8 रात्र आणि 9 दिवसांसाठी आहे. त्यामुळे या पॅकेजमधून नववर्षही जोशात सेलिब्रेट करता येणार आहे. या पॅकेजमधून पुष्कर, रणथंभौर, कुंभलगड, जयपूर आणि उदयपूर येथे फिरण्याची मजा लुटता येणार आहे. या पॅकेजची सुरुवात फ्लाईटने होणार आणि फिरण्यासाठी बसची सुविधा असणार आहे. या पॅकेजचं नाव ख्रिसमस स्पेशल मेवाड राजस्थान असं देण्यात आलं आहे.याबाबतची अधिक माहिती अधिकृत वेबसाईटवर टूर पॅकेजचं नाव टाकून जाणून घेऊ शकता.
या पॅकेजमधून तुम्हाला एकट्याला प्रवास करायचा असेल तर त्यासाठी फी 73900 रुपये आहेत. जर दोन लोकं असाल तर प्रति व्यक्ती पॅकेज 55900 रुपयांना पडेल. तीन जणं असाल तर हे पॅकेज 52,200 प्रति व्यक्ती असेल. लहान मुलांसाठी पॅकेजची फी ही 48900 रुपये असेल. या पॅकेजमधून प्लेनचं येण्याजाण्याचं तिकीट. एसी बसमधून सर्व लोकेशनवर प्रवास असेल. जयपूरमध्ये 2 रात्र, रणथंभौरमध्ये 1 रात्र, 1 रात्र पुष्करमध्ये, 1 रात्र कुंभलगडमध्ये आणि 1 रात्र माउंट आबूमध्ये आणि उदयपूरमध्ये दोन रात्र असा मुक्काम असेल.
सिटी टूरसाठी एक स्थानिय गाईड असणार आहे. स्मारकांसाठी प्रवेश शुल्क असेल. पण दुपारच्या जेवणाचा खर्च तुम्हाला तुमच्या पदरचा करावा लागेल. हॉटेलमध्ये एखादी वेगळी सर्व्हिस घेतली तर त्याचे पैसे तुम्हाला भरावे लागतील. या पॅकेजमध्ये ब्रेकफास्ट आणि रात्रीचा जेवणाचा समावेश आहे. त्यामुळे दुपारचं जेवण तुम्हाला तुमच्या पैशांनी करावं लागेल. अधिक माहितीसाठी तुम्ही आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर जाऊन माहिती घेऊ शकता.