Pizza For Diabetes Patient: मधुमेहाच्या रुग्णांनी पिझ्झा खाणे योग्य की अयोग्य ?
मधुमेहाच्या रुग्णांनाही पिझ्झा खाण्याची इच्छा होते, अशावेळी तज्ज्ञ त्यांना घरी बनवलेला पिझ्झा खायचा सल्ला देतात.
मधुमेह म्हणजेच डायबिटीसच्या (Diabetes) समस्येने आजकाल अनेक लोक त्रस्त आहेत. या आजाराच रुग्णाच्या रक्तातील साखरेची पातळी (blood sugar level) वाढलेली असते. अशावेळी डॉक्टर मधुमेहाच्या रुग्णांना योग्य औषधोपचार, वेळोवेळी तपासणी करणे आणि खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला देतात. मधुमेह झाला असेल तर गोड आणि साखरयुक्त पदार्थ व पेयांपासून दूर राहिले पाहिजे. कारण अगदी थोडासा निष्काळजीपणा देखील आपल्यासाठी एक मोठी समस्या बनू शकते. रक्तातील साखरेची पातळी वाढलेली असेल (blood sugar level) तर पथ्य पाळता-पाळता ती व्यक्ती त्रस्त होते आणि त्यांनी जे पदार्थ खाणे टाळले पाहिजे, त्याच पदार्थांचे (त्या व्यक्तीला) क्रेव्हिंग होते.
तुमच्यासोबतही असेच झाले असेल आणि तुम्हाला पिझ्झा खायला आवडत असेल तर आम्ही तुम्हाला मधुमेह असताना पिझ्झा खाण्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. त्या जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.
मधुमेहाचे रुग्ण पिझ्झा खाऊ शकतात का :
हेल्थ लाइन डॉट कॉम नुसार, मधुमेहाचे रुग्ण सर्व प्रकारचा पिझ्झा खाऊ शकतात. काही गोष्टी लक्षात ठेवत त्यांचे पालन केल्यास (मधुमेहाच्या रुग्णांनी) पिझ्झा खाणे सुरक्षित व आरोग्यदायी आहे.
मधुमेहात पिझ्झा खाण्यासंबंधित महत्त्वपूर्ण फॅक्ट्स :
– बहुतांश डॉक्टर मधुमेहामध्ये रिफाइंड आणि कार्बयुक्त पदार्थांचे अधिक सेवन करू नये, असा सल्ला देतात.ज्यामध्ये पिझ्झाचा बेस किंवा क्रस्ट हा मैद्यापासून बनलेला असतो. मात्र मधुमेहाच्या रुग्णांनी ब्लड शुगर मॅनेजमेंट मध्ये योग्य पद्धतीने व योग्य प्रमाणात रिफाइंड व कार्ब्सचे सेवन केले तर त्यांना फायदा होऊ शकतो.
– रिफाइंड धान्यांमध्ये प्रोटीन आणि फायबर यांसारखी अनेक पोषक मुबलक प्रमाणात आढळतात, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास उपयुक्त ठरतात.
– रिफाइंड धान्यासह स्टार्चयुक्त भाज्या आणि फायबरयुक्त फळे, ही रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास प्रभावी ठरतात. मधुमेहाच्या रुग्णांना जर पिझ्झा खायचा असेल, तर पिझ्झा स्लाइसमध्ये, कार्ब किती व कोणते आहेत, तसेच न्यूट्रिएंट्स, टॉपिंग्ज, फायबर्स आणि प्रोटीन या सर्व गोष्टींची तपासणी आधी करावी.
पिझ्झा खाताना मधुमेहाच्या रुग्णांनी काही गोष्टी लक्षात ठेवाव्या :
– मधुमेहाच्या रुग्णांना उच्च रक्तदाबाचा त्रासही होऊ शकतो, त्यामुळे पिझ्झा खाताना त्यामध्ये मिठाचे प्रमाण किती आहे याची काळजी घ्यावी.
– तुम्ही बदामाच्या पिठाने बनलेल्या बेसच्या पिझ्झाचे सेवन करू शकता, ज्यामुळे फायबरचे सेवन वाढेल.
– फायबर्स साठी टॉपिंग्जमध्ये जास्तीत जास्त ताज्या आणि हिरव्या भाज्यांचा वापर करावा.
– केवळ होममेड फ्रेश सॉसेज याचाच वापर करा.