Corona Virus | कोरोना काळात ‘जॉगिंग’साठी बाहेर जाणे सुरक्षित ठरेल? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेतून देशात पुरता होरपळून निघाला आहे. संक्रमित रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत याकडे दुर्लक्ष करणे आपल्यासाठी आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

Corona Virus | कोरोना काळात ‘जॉगिंग’साठी बाहेर जाणे सुरक्षित ठरेल? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
जॉगिंग
Follow us
| Updated on: May 06, 2021 | 3:12 PM

मुंबई : कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेतून देशात पुरता होरपळून निघाला आहे. संक्रमित रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत याकडे दुर्लक्ष करणे आपल्यासाठी आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. यावेळी आपण सर्वांनी घरीच राहून आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्रोटोकॉलचे अनुसरण केले पाहिजे. नागरिकांनी कोणतेही नियम मोडू नये आणि सुरक्षित राहू राहावे म्हणून अनेक राज्य सरकारांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. म्हणजे या काळात सर्व अनावश्यक गोष्टी बंद राहतील (Is it safe to go outside for walk or jogging during corona pandemic).

कोरोना व्हायरस संसर्ग पसरण्यापासून रोखण्यासाठी सर्व जिम बंद आहेत. अशा वेळी, प्रत्येकाच्या मनात अनेक प्रश्न येत आहे, यातीलच एक म्हणजे या काळात फिरायला जाणे किंवा जॉगिंग करणे सुरक्षित आहे काय? आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आजकाल फिरायला जाणे योग्य नाही. जर ते आपल्या आरोग्यासाठी अतिमहत्त्वाचे असेलच, तर आपण सामाजिक अंतराच्या नियमाचे अनुसरण करून चालण्यासाठी जाऊ शकता. हे आपल्याला सुरक्षित ठेवू शकते.

जर आपण बाहेर फिरायला जात असाल तर कसरत करताना कशालाही स्पर्श करु नका. याशिवाय नेहमीच रिकाम्या जागेवर चाला किंवा व्यायाम करा. जेथे जास्त गर्दी नसेल अशाच ठिकाणी जा. डॉक्टरांच्या मते, सामाजिक अंतर राखणे म्हणजे एकमेकांपासून 6 फूट अंतर ठेवा (Is it safe to go outside for walk or jogging during corona pandemic).

या गोष्टी लक्षात ठेवा :

चालत असताना मास्क लावू नका.

चालणे, धावणे आणि जॉगिंग करताना चेहऱ्यावर मास्क लावू नका. कारण कार्डियो व्हॅस्क्युलर व्यायाम करताना आपल्याला अधिक ऑक्सिजनची आवश्यकता असते. म्हणून, यावेळी फेस मास्क लावू नका. यामुळे आपल्याला श्वास घेण्यात त्रास होऊ शकतो.

रिक्त जागेत चाला.

चालणे, जॉगिंग करणे आणि धावणे चालू असताना चेहऱ्यावर फेस मास्क लावू नका. तथापि, या वेळी आपण गर्दी नसलेल्या ठिकाणी चालत आहात. आपल्या सभोवताल कोणीतरी येत असल्याचे आपल्याला आढळल्यास थांबा आणि चेहऱ्यावर फेस मास्क लावा.

कशालाही स्पर्श करू नका.

जर आपण बाहेर फिरायला जात असाल तर पार्कचा गेट, लिफ्ट, झाडे इत्यादी गोष्टींना थेट स्पर्श करू नका. या व्यतिरिक्त जर आपण हाताने काहीही स्पर्श केला असेल, तर लगेचच अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझर वापरा.

(Is it safe to go outside for walk or jogging during corona pandemic)

हेही वाचा :

Health Tips | शरीरातील ऑक्सिजन पातळी वाढवण्यासाठी आहारात सामील करा ‘हे’ घटक, लवकर दिसून येतील फायदे!

दररोज सकाळी आलं, मध आणि लिंबाचे पाणी प्या, रोगप्रतिकारक शक्ती वाढवा

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.