सतत काम केल्याने तुमचा मेंदूही थकतोय का? जाणून घ्या कसा करावा ताण दूर
सतत काम करत राहिल्यामुळे शरीर तर थकतेच पण काही वेळा आपला मेंदू देखील थकतो. मेंदू थकला की आपल्याला काहीही काम करण्याची इच्छा होत नाही. मेंदूची देखील काम करण्याची एक विशिष्ट मर्यादा आहे. त्याच्या पेक्षा जास्त काम केले की ताण येतो. हा ताण कसा ओळखायचा आणि थांबायचे कसे जाणून घ्या.
Mental Health : कोणतेही काम करण्यासाठी एकाग्रता खूप महत्त्वाची असते. कारण शरीराच्या सर्व अवयवांप्रमाणेच मेंदूचीही कार्य करण्याची क्षमता मर्यादित असते. मेंदूचे काम जर सुरळीत असेल तर योग्य निर्णय घेण्याचे काम चांगले करू शकेल. पण सततच्या कामामुळे काही वेळाने मानसिक भार पडल्यासारखे वाटू लागते. त्यामुळे मन थकायला लागते आणि या थकव्यामुळे कामाच्या गुणवत्तेवरही परिणाम होतो.
शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याची काळजी घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्यामध्ये समतोल राखवा लागतो. तरच काम सुरळीत होऊ शकते. पण जेव्हा आपण हा समतोल राखू शकत नाही आणि मेंदूकडून जास्त काम घेतो तेव्हा मात्र माणूस थकतो. हा थकवा कसा दूर करू शकतो जाणून घेऊयात.
आपण आपला बराच वेळ सोशल मीडियावर घालतो. त्यामुळे त्याचा मर्यादित वापर केला पाहिजे. सोशल मीडियावरच्या पोस्ट पाहून तुम्ही इतरांच्या जीवनाशी तुमची तुलना करू लागता. याचा तुमच्या मनावर दबाव येतो.
मोबाईलचा अतिवापर थांबवलाच पाहिजे. तुम्ही स्क्रीनसमोर जितके जास्त वेळ घालवला तितका तुमचा मेंदू सक्रिय राहतो. त्यामुळे तुमच्या मेंदूला थकवा जाणवू लागतो. म्हणून, तुमचे काम संपल्यानंतर, तुमचा फोन बाजूला ठेवा आणि स्वतःला अशा काही कामात गुंतवून घ्या की ज्यामुळे तुमचा मेंदू आणि मूड फ्रेश होईल.
तुम्हाला आवडत नसलेल्या गोष्टींना नाही म्हणायला शिकले पाहिजे. आपल्या शरीराचे ऐका आणि त्याची क्षमता ओळखा. जेव्हा तुम्हाला असे वाटते की तुमचे डोळे दुखत आहेत किंवा लाल होतात, तुमचे सांधे दुखत आहेत, तुमचे डोके जड वाटत आहे, तेव्हा लगेच झोप घ्या. आपल्या शरीरावर काम करण्यास भाग पाडू नका.
ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणात नाहीत त्या सोडून देता आले पाहिजे. जीवनातील इतर सकारात्मक पैलूंवर लक्ष केंद्रित करा आणि जीवनात पुढे जा. अतिरिक्त कामाचा भार घेऊ नका. यामुळे अतिरिक्त ताण येतो.