चमकदार आणि मुलायम केस करण्यासाठी ‘तेल मालिश’ करणे आवश्यक!
व्यस्त जीवनशैलीमुळे आपण आपल्या केसांची चांगली काळजी घेऊ शकत नाही. यामुळे केस गळणे आणि कोंड्याचा समस्या निर्माण होतात.
मुंबई : व्यस्त जीवनशैलीमुळे आपण आपल्या केसांची चांगली काळजी घेऊ शकत नाही. यामुळे केस गळणे आणि कोंड्याचा समस्या निर्माण होतात. आपणही केस गळतीच्या समस्येमुळे त्रस्त असाल तर कोमट तेलाने आपल्या केसांची मालिश करा. कोमट तेलाने मालिश केल्याने आपले केस अधिक मजबूत होतात. त्याचबरोबर यामुळे आपले मनही शांत राहते. कोमट तेलाने केसांना मालिश करण्याचे अनेक फायदे आहेत. (It is beneficial to apply oil on the hair)
केस मजबूत होतात केसांच्या टाळूला मालिश केल्याने रक्त परिसंचरण वाढते आणि केसांच्या रोमांना आवश्यक पोषण मिळते. ज्याप्रकारे आपल्या शरीराला पोषण आवश्यक आहे, त्याचप्रमाणे केसांना देखील वाढ होण्यासाठी योग्य पोषण आवश्यक आहे. नियमितपणे केसांना तेलाची मालिश केल्याने आपले केस अधिक मजबूत होतात.
डोक्यातील कोंडा दूर डोक्यात कोंडा होण्याचे प्रमुख कारण म्हणजे ज्या लोकांची टाळू कोरडी असते. त्यांना विशेष करून कोंडा होण्याची समस्या अधिक असते. डोक्यात कोंडा होणे टाळण्यासाठी तेल मालिश टाळूवर करा. यामुळे आपल्या डोक्यातील कोंड्याची समस्या दूर होईल.
केस गळती रोखण्यासाठी जर, आपल्या केसांत कोंड्याची समस्या उद्भवली असेल, तर त्यामुळे आपले केस गळू लागतात किंवा केस तुटू लागतात. या समस्येवर खोबरेल तेल अतिशय उपयुक्त ठरते. शुद्ध खोबरेल तेलाने हलक्या हातांनी दररोज केसांना मसाज करा. यामुळे आपले केस मजबूत आणि दाट होतीलच, तसेच कोंड्याच्या समस्येपासून मुक्तता मिळेल.
कोरडे निर्जीव केस जर आपले केस कोरडे व निर्जीव वाटत असतील, तर तूप यामध्ये खूप उपयुक्त ठरू शकेल. यासाठी आपल्या केसांना हलक्या गरम केलेल्या तुपाने मसाज करा आणि नंतर लिंबाचा रस लावा. अर्ध्या तासानंतर आपले केस स्वच्छ धुवा.
गरम तेलाने मालिश करण्याची योग्य पध्दत
1. आपल्या केसांनुसार तेल घ्या आणि ते एका भांड्यात ठेवा आणि हलके गरम करा.
2. केसांना गरम तेल लावताना अगोदर बोट तेलात बुडवा ते कोमट असेल तर केसांना लावा. तेल जास्त गरम केल्याने पोषकद्रव्ये कमी होतात.
3. यानंतर हलक्या हातांनी केसांची मालिश करा. सुमारे 10 ते 15 मिनिटे आपल्या केसांची मालिश करा.
4. तेल लावण्यानंतर साधारण एक तास केसांवर तेल ठेवा किंवा रात्रभर ठेवा आणि सकाळी धुवा.
5. तेल लावल्यानंतर शैम्पू लावून आपले केस धुवा नाहीतर केस तेलकट राहतील.
टीप : कोणताही उपाय करण्यापूर्वी नेहमीच एखाद्या विशेषज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
संबंधित बातम्या :
Skin care : ऑफिस शिफ्टमध्ये त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी वापरा या टिप्स, चेहरा दिसेल तजेलदार
किवी आरोग्यासाठी जबरदस्त फायदेशीर, वाचा फायदे https://t.co/cUqNVdKB2R #Kiwi | #HealthCare | #healthtips
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 25, 2021
(It is beneficial to apply oil on the hair)