कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ‘हा’ काढा पिणे जबरदस्त फायदेशीर, वाचा !
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे आवश्यक आहे.
मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे आवश्यक आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अनेकांनी त्यांच्या आहारात मोठे बदल केले आहेत. कारण जर तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असलेतर तुम्ही कोरोनापासून दूर राहू शकता. मात्र, रोगप्रतिकारक शक्ती नेमकी कशी वाढवावी हा प्रश्न अनेकांच्या समोर उभा आहे. आज आम्ही तुम्हाला रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खास एक पेय सांगणार आहोत. (It is beneficial to drink asafoetida, cinnamon and red chilli extract to boost the immune system)
1. सहा ते सात गुळवेलची पाने
2. हिंग चार ते पाच
3. दालचिनी तीन
4. लाल मिरची
5. तुळशीचे पाने तीन ते चार
6. आद्रक
7.गुळ
कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गुळवेल अत्यंत फायदेशी आहे. हे आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यास देखील मदत करते. गुळवेलची आणि तुळशीची पाने बारीक करून घ्या. एक ग्लास पानी मंद आचेवर गरम करण्यासाठी ठेवा. त्यानंतर पाणी थोडे कोमट झाल्यानंतर त्यामध्ये दालचिनी आणि आद्रक घाला.
त्यामध्ये लाल मिरची हिंग घाला आणि हे पाणी साधारण 30 ते 40 मिनिटे उकळून घ्या त्यानंतर शेवटी यामध्ये गुळ घाला आणि हा काढा चहासारखे प्या. आपण दररोज सकाळी रिकाम्या पोटी हा काढा पिऊ शकतो. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास फायदा होतो. तुळशीचा काढा पिल्याने शरीरातील विषारी द्रव्य सहजपणे बाहेर पडतात. तुळशीमध्ये अँटी-बॅक्टेरियाचे गुणधर्म आहेत.
ते आपल्याला सर्दी आणि खोकल्यापासून वाचविण्यात मदत करतात. तुळसमध्ये अँटीऑक्सिडेंट गुणधर्म आहेत. ते आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. संसर्ग टाळण्यासाठी फुफ्फुसांना मदत करतात. तुळशीमध्ये अँटिप्रेसस गुणधर्म आहेत. ते आपल्याला तणावमुक्त करतात. ते शरीरात कार्टिझोल पातळी संतुलित करतात. तुळशीत एंटी-डिप्रेससन्ट गुणधर्म आहेत. यामुळे अनेक रोग आपल्यापासून दूर राहतात.
संबंधित बातम्या :
Weight Loss | ‘वेट लॉस जर्नी’दरम्यान वारंवार वजन तपासताय? मग ‘या’ गोष्टी आधी जाणून घ्या!
चपाती खाल्यानंतर ‘ही’ चूक अजिबात करु नका, आरोग्यास होऊ शकतं नुकसानhttps://t.co/YhmdUa5Ut6 #HealthTips | #Health | #Lifestyle | #Tv9Marathi
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 31, 2020
(It is beneficial to drink asafoetida, cinnamon and red chilli extract to boost the immune system)