जास्तीत-जास्त ताक प्या आणि वजन कमी करा, वाचा याबद्दल अधिक !
ताक पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. ताक पिल्ल्याने आपले शरीर थंड राहते.
मुंबई : ताक पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. ताक पिल्ल्याने आपले शरीर थंड राहते. ताकात पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, लोह, फॉस्फोरस, इत्यादी खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात. आपल्यापैकी अनेकजण वजन कमी करण्यासाठी डाएड करतात, जिम लावतात. मात्र, हे सर्व करून सुध्दा वजन लवकर कमी होत नाही. आज आम्ही तुम्हाला असे एक पेय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचे वजन झटपट कमी होईल. (It is beneficial to drink buttermilk for weight loss)
आपल्या दिवसाची सुरूवात ताकापासून करा. सकाळी उठल्यावर एक ग्लास ताक घ्या. दिवसातून दोन वेळा जेवण करा आणि त्याव्यतिरिक्त जेंव्हा तुम्हाला भूक लागेल त्यावेळी ताक प्या. दिवसातून आपण ताक कितीही पिऊ शकता. ताक पिल्यामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी निघून जाण्यास मदत होते. आपण जर हे सतत दोन ते तीन महिने केलेतर आपल्या शरीरावरील अतिरिक्त चरबी निघून जाण्यास मदत होईल.
जर तुम्हाला अपचना संदर्भातील काही समस्या असतील तर तुम्ही आहारामध्ये रोज ताक घ्या यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होणार नाही. बऱ्याच वेळी डाॅक्टर देखील ज्यालोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांना ताक पिण्याचा सल्ला देतात. बऱ्याच लोकांना साधे ताक पिऊ वाटत नाही. मग अशावेळी तुम्ही ताकात जिरे पुड, मीठ आणि कोथींबीर घालू शकतात. किंवा पोळवलेले ताक देखील घरी तयार करू शकतात.
ताक पचनासाठी अत्यंत हलके असते. ताकामुळे पचनाचे असलेले सर्व विकार दूर होण्यास मदत होते. विशेष म्हणजे यामुळे आपली पचनप्रक्रिया चांगली आणि सुरळीत होण्यास मदत देखील होते. ताक पिल्ल्याने आपली त्वचा देखील चांगली होते. तसेच चेहऱ्यावर ज्या ठिकाणी काळे डाग आहेत, त्या ठिकाणी कापसाने ताक लावा. सुकल्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ करा. यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यास नक्की मदत होईल.
संबंधित बातम्या :
Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो
पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!
Immunity Booster | थंडीच्या दिवसांत आवळ्याचा रस आरोग्यवर्धक, इम्युनिटी वाढवण्यासाठी ‘हे’ नक्की ट्राय करा!https://t.co/XPmKiIDsHE#ImmunityBooster #AmlaJuice
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 28, 2020
(It is beneficial to drink buttermilk for weight loss)