ग्रीन- टीमध्ये पुदीना पाने आणि दालचिनी मिक्स करा आणि वाढवा रोगप्रतिकारक शक्ती !

नेकजण आपल्या सकाळची सुरूवात ग्रीन टी पिण्यापासून करतात. ग्रीन टी पिणे हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

ग्रीन- टीमध्ये पुदीना पाने आणि दालचिनी मिक्स करा आणि वाढवा रोगप्रतिकारक शक्ती !
Follow us
| Updated on: May 02, 2021 | 4:06 PM

मुंबई : अनेकजण आपल्या सकाळची सुरूवात ग्रीन टी पिण्यापासून करतात. ग्रीन टी पिणे हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. ग्रीन टीमध्ये अॅंटी-ऑक्सीडंट आणि पॉलीफेनॉल घटक असतात. तसेच ग्रीन टी ही तुमच्या त्वचेसाठीही उत्तम मानली जाते. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, ग्रीन टीमध्ये पुदीना पाने आणि दालचिनी मिक्स करून पिल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती अधिक मजबूत होते. (It is beneficial to mix mint leaves and cinnamon in green tea)

पुदीना पाने आणि दालचिनी ग्रीन- टीमध्ये पुदीनाची पाने टाकल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढते, पचनक्रिया सुधारते आणि आपली भूक देखील कमी होते. यासारखे आरोग्यविषयक अनेक फायदे मिळतात. तसेच, दालचिनी देखील वजन कमी करण्यास मदत करते. पुदीन्याच्या पानांमध्ये मेन्थॉल, प्रथिने, चरबी, कर्बोदके, व्हिटामिन-ए, राइबोफ्लेविन, तांबे आणि लोह आढळतात. या पानांच्या सेवनाने उलट्या रोखता येतात आणि पोटातील गॅस देखील काढून टाकता येतो. तसेच, साठलेल्या कफावर देखील पुदिना उपयुक्त आहे.

पुदीना गरम प्रभावाचा आहे, ज्यामुळे तो शरीरातून घाम काढून ताप काढून टाकतो. आपल्याला एखादा किडा चावल्यास, त्याचे विष काढून करण्याचे गुणधर्म देखील पुदीन्यामध्ये आहेत. दालचिनी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. तसेच दालचिनीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. ज्यामुळे आपल्या चेहर्‍यावरील मुरुम कमी होण्यास मदत होते.

ग्रीन टी सोबतच नियमित व्यायामही गरजेचा असतो. निरोगी राहण्यासाठी नियमित व्यायामासोबतच, फळ, पालेभाज्या यांचे सेवन करणे गरजेचे आहे. ग्रीन टी तयार करण्यासाठी पाण्याला खूप जास्त गरम करु नका. त्यामुळे त्यात आवश्यक जीवनसत्त्व नष्ट होतात. चांगल्या परिणामांसाठी तुम्ही पाणी गरम करुन 10 मिनीटे तसेच ठेवा. ग्रीन टीचे पॅकेट कपात घेऊन त्यावर गरम पाणी टाका आणि 1 मिनीटे तसेच ठेवा. ग्रीन टी आणि पाणी एकत्रित झाल्यानंतर प्या.

संबंधित बातम्या : 

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(It is beneficial to mix mint leaves and cinnamon in green tea)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.