फिरण्याचा प्लॅन करताय? ‘या’ ठिकाणी ट्रिप प्लॅन करा
फिरण्याचा प्लॅन करताय का? असं असेल तर ही बातमी नक्की वाचा. हिवाळ्यात अनेकदा बर्फाळ ठिकाणी जाणे लोकांना आवडते. पण आता तिथे खूप गर्दी होत आहे. अशावेळी काहींना शांतता हवी असते आणि गर्दीची ठिकाणे टाळायची असतात. आम्ही तुम्हाला अशी काही ठिकाणे सांगत आहोत जिथे तुम्ही तुमच्या हिवाळ्याच्या सुट्ट्यांचा आनंद घेऊ शकता.
हिवाळ्यात गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी ट्रिप प्लॅन करताय का? असं असेल तर ही बातमी नक्की वाचा. हिवाळ्याच्या सुट्ट्या येताच अनेकदा लोक डोंगराकडे वळतात. बर्फाच्छादित डोंगर, थंड वारे आणि मनमोहक दृश्ये सुट्ट्या खास बनवतात. पण अनेकदा पुन्हा पुन्हा डोंगरावर जाऊन हा अनुभव कंटाळवाणा वाटतो. त्याचबरोबर डोंगरावर प्रचंड गर्दी होत असल्याने कोंडीचीही समस्या निर्माण झाली आहे.
तुम्हालाही डोंगराच्या सहलींचा कंटाळा आला असेल आणि यावेळी काहीतरी नवीन ट्राय करायचं असेल तर घाबरून जाण्याची गरज नाही. भारतातील पर्वतरांगांशिवाय अशी अनेक उत्तम ठिकाणे आहेत जिथे तुम्ही हिवाळ्यातील सुट्ट्या खास बनवू शकता.
समुद्रकिनारा, वाळवंटातील वाळू आवडत असो किंवा ऐतिहासिक वारसा शोधत असाल, प्रत्येकासाठी काहीतरी खास असतं. या ठिकाणांना भेट दिल्याने तुम्हाला काहीतरी नवीन अनुभवता येईलच, शिवाय थंडीचा पुरेपूर आनंदही घेता येणार आहे. या लेखात, आम्ही आपल्याला काही सर्वोत्तम ठिकाणांबद्दल सांगणार आहोत जे डोंगरांपेक्षा वेगळे आणि अद्वितीय आहेत आणि हिवाळ्याच्या सुट्ट्यांसाठी परिपूर्ण आहेत.
उदयपूर (राजस्थान)
हिवाळ्याच्या हंगामात राजस्थान फिरण्यासाठी योग्य आहे. उदयपूरचे तलाव तुमचा प्रवास खास बनवतील. लेक पिछोला उदयपूरमधील सर्वात प्रसिद्ध तलाव आहे, जिथे आपण बोट राइडचा आनंद घेऊ शकता. तलावाच्या मधोमध वसलेले “जग मंदिर” आणि “लेक पॅलेस” या तलावाच्या सौंदर्यात भर घालतात. संध्याकाळी इथलं दृश्य अतिशय सुंदर असतं. राजस्थानी संस्कृती आणि जेवणाचा आस्वाद ही तुम्ही इथे घेऊ शकता.
रणथंभौर राष्ट्रीय उद्यान
तुम्हाला निसर्ग आणि वन्यजीवांची आवड असेल तर तुम्ही रणथंभौर नॅशनल पार्कला जाऊ शकता. हिवाळ्याच्या काळात इथलं हवामानही खूप चांगलं असतं, त्यामुळे तुम्ही इथे फिरण्याचा आनंद घ्याल. हिवाळ्यात सफारी आणि वाघ निरीक्षणासाठीही हे ठिकाण प्रसिद्ध आहे.
वाराणसी
हिवाळ्यात फिरण्यासाठी वाराणसी एक अनोखे डेस्टिनेशन आहे. गंगा आरती, घाटांचे सौंदर्य आणि इथले आध्यात्मिक वातावरण तुम्हाला एक वेगळाच अनुभव देईल. इथल्या रस्त्यावर फिरताना तुम्ही बनारसी जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. तुम्ही शॉपिंगही करू शकता. वाराणसीच्या अरुंद गल्ल्या आणि त्यात विकले जाणारे चांगले पदार्थ तुमचा प्रवास आणखी मजेदार बनवतील.
आग्रा
आग्रा शहर केवळ ताजमहालसाठीच ओळखले जात नाही, तर येथील किल्ले, बगीचे आणि बाजारपेठा देखील विशेष आकर्षण आहेत. हिवाळ्यात आग्र्याचं हवामान आल्हाददायक असतं, त्यामुळे तुम्ही आरामात या शहराच्या सौंदर्याचा आनंद घेऊ शकता. ताज महालबरोबरच मेहताब बाग, आग्रा किल्ला, इतिमाद-उद-दौलाचा मकबरा, जामा मशीद आणि फतेहपूर सिक्री अशा अनेक ऐतिहासिक स्थळांना भेट देता येते.
जयपूर
जयपूर, ज्याला “पिंक सिटी” म्हणून देखील ओळखले जाते, हे भारतातील एक शहर आहे जिथे इतिहास, संस्कृती आणि आधुनिकतेचा अनोखा संगम आहे. हिवाळ्यात येथील हवामानही आल्हाददायक असते. हिवाळ्याच्या या थंडीच्या ऋतूत तुम्ही तिथे आरामात फिरू शकता. जयपूरमध्ये हवा महल, आमेर किल्ला, जल महल, सिटी पॅलेस आणि नाहरगड किल्ला अशी अनेक ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळे आहेत.