तुम्हीही चेहऱ्यासाठी वापरता व्हिटॅमिन सी ? मग आधी हे वाचाच..
व्हिटॅमिन सी युक्त अनेक प्रॉडक्ट्स मिळतात, मात्र ते वापरण्याची योग्य पद्धत कोणती हे फारच कमी जणांना माहीत असतं. तुम्हीही व्हिटॅमिन सी युक्त प्रॉडक्टस्चा वापर करत असाल तर या गोष्टींची काळजी घ्या.

नवी दिल्ली / 19 जुलै 2023 : आपला चेहरा किंवा त्वचेची काळजी (skin care) घेण्यासाठी बाजारात महाग ते स्वस्त अनेक उत्पादने उपलब्ध आहेत. त्यापैकीच एक उत्पादन म्हणजे व्हिटॅमिन सी, जे त्वचा चमकदार बनवण्याचे व ती हेल्दी ठेवण्याचे कार्य करते. तुम्हाला व्हिटॅमिन सी युक्त अनेक प्रॉडक्ट्स मिळतील, मात्र ते वापरण्याची योग्य पद्धत कोणती हे फारच कमी जणांना माहीत असतं. ते चेहऱ्यावर नक्की किती वेळा लावलं तर फायदेशीर ठरतं ?
व्हिटॅमिन सी युक्त प्रॉडक्ट्सचा त्वचेसाठी वापर करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे ते जाणून घेऊया.
सकाळी लावणं
बहुतांश लोकांना असं वाटतं व्हिटॅमिन सी युक्त प्रॉडक्ट्सचा सकाळी वापर केल्यास अनेक फायदे मिळतात. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट त्वचेचे संरक्षण करतात आणि उन्हापासून संरक्षण देतात. अशा परिस्थितीत, त्वचा चमकू लागते.
रात्री वापर करणं
तर काही लोकांना असं वाटतं की व्हिटॅमिन सी असलेली उत्पादने रात्री वापरणं उत्तम ठरतं. कारण त्यात उपलब्ध असलेली तत्वं रात्री झोपताना स्किन चांगल्या प्रकारे रिपेअर करू शकतात आणि कोलेजनचे उत्पादनही वाढते.
या गोष्टींची घ्या काळजी
जर तुम्ही प्रथमच व्हिटॅमिन सी युक्त उत्पादने वापरत असाल तर वापरापूर्वी पॅच टेस्ट जरूर करावी. तसेच ते चेहऱ्यावर लावताना त्याचे प्रमाण किंवा क्वांटिटी कमी असावी.
कोणतंही उत्पादन वापरण्यापूर्वी त्यावर लिहीलेल्या सर्व सूचना नीट वाचून व समजून घ्याव्यात. मगच उत्पादनाचा वापर करावा.
व्हिटॅमिन सी युक्त उत्पादनाचा वापर करण्यापूर्वी त्वचारोग तज्ज्ञांशी बोलून त्यांचा सल्ला घ्या. तसेच तुमच्या स्किन टाइपचीही काळजी घ्या.
लालसरपणा, खाज येणे, अशा कोणतीही समस्या जाणवली तर अशा प्रॉडक्ट्सचा त्वचेसाठी चुकूनही वापर करू नका. ते घातक ठरू शकते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)