Indian Spices | केवळ स्वादाचा तडकाच नव्हे, तर आरोग्यासाठीही लाभदायी ‘मसाले’, वाचा याचे फायदे…
भारतीय स्वयंपाकघरात आपल्याला अनेक प्रकारचे मसाले आढळतील. या मसाल्यांचा आयुर्वेदशी खूप गहन संबंध आहे.
मुंबई : भारतीय स्वयंपाकघरात आपल्याला अनेक प्रकारचे मसाले आढळतील. या मसाल्यांचा आयुर्वेदशी खूप गहन संबंध आहे. ते फक्त अन्नाची चव वाढवत नाहीत तर, यासह बर्याच रोगांमध्ये देखील उपयुक्त आहेत. मग, तो आपल्या स्वयंपाकघरातील कोणताही मसाला असो वा ओवा, हळद किंवा हिंग. हे सर्व मसाले अनेक प्रकारच्या रोगात देखील वापरले जातात (Amazing Health benefits of Indian Spices).
अन्नाची चव वाढवण्यासाठी बरेच लोक त्यांच्या चवीनुसार विविध प्रकारचे मसाले वापरतात. परंतु, हे मसाले केवळ अन्नाची चवच वाढवत नाहीत तर आरोग्याच्या दृष्टीनेही फायदेशीर ठरतात. यामध्ये, असे बरेच नैसर्गिक गुणधर्म आहेत जे शरीराला बर्याच रोगांपासून वाचवतात. चला तर जाणून घेऊया ‘या’ मसाल्यांचे औषधी गुणधर्म…
हळद लोकांना वाटतं की, हळद भाजी आणि डाळीच्या सुंदर रंगासाठी वापरली जाते. पण इतकेच नाही तर, हळद औषधी गुणधर्मांचा खजिना आहे. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा एक नैसर्गिक घटक असतो, जो अँटि-ऑक्सिडेंट म्हणून कार्य करतो आणि शरीरातून विषारी पदार्थ अर्थात टॉक्सिक घटक काढून टाकतो. हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म देखील आढळतात, जे शरीराचे अनेक प्रकारच्या संक्रमणापासून संरक्षण करतात. हळद एक उत्कृष्ट इम्युनिटी बूस्टर देखील आहे.
लाल मिरची लोक लाल मिरची आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे मानतात. परंतु, त्याचा मर्यादित वापर हानिकारक नाही. लाल मिरचीचे मर्यादित प्रमाणात सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो आणि ते आपले कोलेस्ट्रॉलपासून बचाव करते. लाल मिरची शरीरातील उष्मांक जळण्यास देखील उपयुक्त आहे.
मीठ मीठ ही अन्नातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे. मिठाशिवाय कोणत्याही अन्न्पादार्थाला चव येत नाही. मीठात आयोडीन असते. आयोडीनच्या कमतरतेमुळे शरीरातील थायरॉईड ग्रंथी योग्यरित्या कार्य करण्यास सक्षम नसतात आणि त्यामुळे अओग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. त्याच वेळी, मर्यादित प्रमाणात मीठ सेवन केल्यास चांगले कोलेस्ट्रॉल देखील वाढते.
जिरे जिरे एक उत्कृष्ट अँटिऑक्सिडेंट आहे. त्यात फायबर, लोह, तांबे, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅंगनीज, जस्त आणि मॅग्नेशियम त्यासोबतच जीवनसत्त्वे ई, ए, सी आणि बी कॉम्प्लेक्स सारखे खनिज पदार्थ देखील आढळतात. हे शरीराची जळजळ कमी करण्यास आणि स्नायूंना आराम देण्यास उपयुक्त आहे (Amazing Health benefits of Indian Spices).
हिंग डाळ-भाजीमध्ये सुगंध आणि वाढवणारा हिंग अपचन आणि पोटातील सर्व समस्यांसाठी फायदेशीर ठरतो. याशिवाय श्वसनमार्गाशी संबंधित समस्यांमध्येही हिंग खूप फायदेशीर आहे.
धणे पावडर धणे थंड प्रकृतीचे असतात. याच्या नियमित सेवनाने पोटातील संक्रमण, आम्लपित्त आणि शरीरातील जळजळ यासारख्या समस्या दूर होतात. तसेच, याच्या सेवनाने पाचक प्रणाली सुधारते आणि अॅलर्जीपासून शरीराचे रक्षण करते.
गरम मसाला गरम मसाला हा पारंपारिक मसाल्यांचा एक अद्भुत संयोजन आहे. अन्नाची चव वाढवण्याबरोबरच तो चयापचय दर वाढवतो आणि पचन क्रिया सुधारते.
संबंधित बातम्या :
Face Massage | त्वचेसाठी संजीवनी ठरेल ‘फेस मसाज’, वाचा याचे फायदे…
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
(Amazing Health benefits of Indian Spices)