अॅपल सायडर व्हिनेगरचा अशाप्रकारे वापर करा आणि वाढलेले वजन कमी करा!
अॅपल सायडर व्हिनेगर आरोग्यासाठी आणि आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये औषधी गुणधर्म असतात, ज्यामुळे बरेच रोग दूर राहतात.
मुंबई : अॅपल सायडर व्हिनेगर आरोग्यासाठी आणि आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये औषधी गुणधर्म असतात, ज्यामुळे बरेच रोग दूर राहतात. अॅपल सायडर व्हिनेगर, सफरचंद आणि यीस्ट बॅक्टेरिया यांचे मिश्रण करून बनवले जातात. हे केवळ एक पेयच नाही तर, त्यात अनेक खनिजे, जीवनसत्त्वे आणि बरेच अॅसिड असतात. (Apple cider vinegar is beneficial for weight loss)
विशेष म्हणजे वाढलेले वजन कमी करण्यासाठी अॅपल सायडर व्हिनेगर अत्यंत फायदेशीर आहे. यासाठी आपण दररोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यामध्ये अॅपल सायडर व्हिनेगर मिक्स करून पिले पाहिजे. ज्यामुळे आपल्या शरीरावरील चरबी बर्न होण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी आपण अॅपल सायडर व्हिनेगर वापर नेहमी केला पाहिजेत. हे पेय सेवन केल्याने मधुमेह टाईप 2, उच्च कोलेस्ट्रॉलसारखे आजार बरे होतात.
अॅपल सायडर व्हिनेगरच्या फायद्यांविषयी बहुतेक लोकांना माहित आहे. जर, आपल्याला बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या असेल, तर सकाळच्या वेळी अॅपल सायडर व्हिनेगर सेवन करा. सकाळी एका ग्लास पाण्यात, एक चमचा अॅपल सायडर व्हिनेगर मिसळून सेवन केल्याने ही समस्या कमी होईल. अॅपल साइडर व्हिनेगरमध्ये अँटीऑक्सिडेंट आणि अँटी मायक्रोबियल गुणधर्म असतात. याशिवाय, रक्तातील साखर देखील कमी करते, ज्यामुळे मधुमेह होण्याचा धोका कमी होतो.
हे व्हिनेगर आपल्या शरीरास कर्करोगापासून वाचवते आणि कर्करोगाच्या पेशी वाढण्यास प्रतिबंध करते. कर्करोगासारख्या गंभीर आजारापासून बचाव करण्याबरोबरच तुमची रोगप्रतिकारशक्तीही वाढते. शरीरातील आम्ल पातळी नियंत्रित करते, त्यामुळे पचनशक्ती देखील वाढते. कोणत्याही प्रकारच्या जखमेच्या बऱ्या करण्यासाठी अॅपल साइडर व्हिनेगर खूप फायदेशीर आहे.
संबंधित बातम्या :
Food | ‘या’ पदार्थांना दूर ठेवा आणि हिवाळ्याच्या काळात सर्दी-खोकल्यापासून सुरक्षित राहा!
Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो
Health | देशातील 10 टक्के महिला PCODने ग्रासित, जाणून घ्या ‘या’ आजाराबद्दल…https://t.co/j8mizk9UJ9#PCOD #health
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 17, 2020
(Apple cider vinegar is beneficial for weight loss)