शरीर तंदुरूस्त ठेवण्यासाठी अॅवकाडो फायदेशीर, आजच आहारात समाविष्ट करा

अॅवकाडो हे फळ आरोग्यासाठी चांगले आणि एक पौष्टिक फळांपैकी आहे, ज्यामध्ये सर्व प्रकारचे महत्त्वपूर्ण जीवनसत्त्वे आहेत.

शरीर तंदुरूस्त ठेवण्यासाठी अॅवकाडो  फायदेशीर, आजच आहारात समाविष्ट करा
Follow us
| Updated on: Mar 19, 2021 | 11:51 AM

मुंबई : अॅवकाडो हे फळ आरोग्यासाठी चांगले आणि एक पौष्टिक फळांपैकी आहे, ज्यामध्ये सर्व प्रकारचे महत्त्वपूर्ण जीवनसत्त्वे आहेत. या फळामुळे पचन सुधारते, वजन कमी करण्यास मदत होते. विशेष म्हणजे यामुळे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. हे फळ सलादमध्ये जास्त करून वापरले जाते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत या फळाचे नेमके कोणते फायदे आपल्या आरोग्याला होतात आणि कशाप्रकारे आपण या फळाला आहारात समाविष्ट करू शकता. (Avocado is good for health)

अॅवकाडो फळ सर्वात अगोदर कापुन घ्या त्यानंतर त्यात थोडेसे ऑलिव्ह तेल, मीठ, मिरचीपूड आणि जिरेपूड घाला आणि खा…अशाप्रकारे हे फळ दररोज खाऊन तुम्ही तुमच्या दिवसाची सुरूवात करू शकता. मेटॅबोलिक सिंड्रोम अॅवकाडोमुळे कमी होतो. अॅवकाडो सेवन करणाऱ्यांना ई जीवनसत्त्व, तांबे, मॅग्नेशियम, क जीवनसत्त्व, फोलेट, कबरेदके मिळतात. अॅवकाडो सेवनाने इन्शुलिन व होमोसिस्टीनचे प्रमाण योग्य राहते. होमोसिस्टीन वाढल्यास हृदयविकार होतो.

अॅवकाडो, मक्खन आणि जामसोबत आपण पोळी देखील खाऊ शकतो. अॅवकाडो खाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पोट साफ राहते. फायबर्सने परिपूर्ण असे सलाद खाल्ल्याने पोटातील जमा विषारी घटक शरीराबाहेर फेकले जातात त्यामुळे आतडी आतून स्वच्छ होऊन, बद्धकोष्टता दूर होते आणि पचनासंबधित सर्व विकारांना आळा बसतो. यातील भाज्यांमध्ये सर्व प्रकारची जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असल्यामुळे, शरीरातील जीवनसत्वांचा अभाव सलाद खाल्ल्याने दूर होतो.

अॅवकाडोचा सूप देखील आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अॅवकाडोचा सूप तयार करण्याचे अनेक प्रकार आहेत. सूप तयार करण्यासाठी अॅवकाडो अगोदर शिजवून द्या. रोज सकाळी अॅवकाडो आणि चिकन देखील तुम्ही खाऊ शकतात. यामुळे दिवसभर तुमच्या शरीराला उर्जा मिळेल. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Food | थंडीच्या दिवसांत आहारात ‘या’ गोष्टी समविष्ट करा आणि आजारांपासून दूर राहा!

Snoring Issue | जाणून घ्या का उद्भवते घोरण्याची समस्या? ‘या’ सोप्या पद्धती वापरा आणि शांत झोपेचा आनंद घ्या…

(Avocado is good for health)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.