Health Care : पावसाळ्यात चुकूनही मशरूम खाऊ नका, बिघडू शकतं आरोग्य!
या पावसाळ्याच्या हंगामात आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे महत्वाचे आहे. कारण याच हंगामात पोटदुखी आणि विषबाधा होण्याची शक्यता अधिक असते.
मुंबई : या पावसाळ्याच्या हंगामात आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे महत्वाचे आहे. कारण याच हंगामात पोटदुखी आणि विषबाधा होण्याची शक्यता अधिक असते. या हंगामात बाहेरील खाद्यपदार्थ खाणे पुर्णपणे टाळले पाहिजेत. कारण बॅक्टेरियाने संक्रमित अन्न खाल्ल्यास विषबाधा, सूज येणे, अतिसार, उलट्या इत्यादी होऊ शकतात. याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो आणि आपण आजारी पडण्याची दाट शक्यता असते. (Avoid eating mushrooms during the rainy season)
विशेष करून या हंगामात आपण मशरूम खाणे पूर्णपणे टाळले पाहिजे. कारण पावसाळ्यात जास्त आर्द्रतेमुळे कीटक आणि जीवाणू मशरूमवर लवकर वाढतात. मशरूमवरील जीवाणू आपल्याला दिसत नाहीत. मात्र, यामुळे पोटदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. म्हणून, पावसाळ्यात मशरूम खाणे टाळा. आपल्या सर्वांना माहीती आहे की, मशरूम खाणे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे. मात्र, पावसाळ्यात मशरूमवर जीवाणू वाढतात.
ज्यामुळे आपल्याला आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. मानवी शरीरासाठी व्हिटॅमिन D खूप आवश्यक आहे. शरीरात याची कमतरता पडल्यास अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. असं असलं तरी व्हिटॅमिन D खूप कमी भाज्यांमध्ये सापडते. यापैकी मशरूम एक आहे. मशरूम खाल्ल्यास शरीराला मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन D मिळते. यामुळे शरीराची व्हिटॅमिन D ची गरज पूर्ण होते.
पांढऱ्या आणि पोर्टेबेला प्रकारच्या मशरूममध्ये याचं प्रमाण सर्वाधिक असते. आहार तज्ज्ञ देखील मशरूमला दैनंदिन आहारात समाविष्ट करण्याचा सल्ला देतात. मात्र, पावसाळ्यात मशरूम खाणे टाळले पाहिजे, असा सल्ला डाॅक्टर देखील देतात. मशरूम अगदी सहजपणे बाजारात उपलब्ध होतात. त्याचे वेगवेगळे पदार्थ तयार करण्याची पद्धत देखील अगदी साधीसोपी आहे. खूप कमी वेळेत मशरूमचे सलाड, भाजी किंवा सूप तयार करता येते.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Avoid eating mushrooms during the rainy season)