ब्रेकफास्टमध्ये चुकूनही खाऊ नका ‘या’ गोष्टी, लठ्ठपणाचे होऊ शकता शिकार
बऱ्याच वेळा हेल्दी फूड देखील नाश्त्यात त्रासाचे कारण बनू शकतात. कारण सकाळचे पहिले मील म्हणजे नाश्त्यात हेल्दी पदार्थ खाण्याचे अनेकजण सल्ला देत असतात. तर अनेकवेळा लोकं काही अनहेल्दी गोष्टींना हेल्दी मानतात व नाश्त्यात त्या पदार्थांचे सेवन करत असतात.
![ब्रेकफास्टमध्ये चुकूनही खाऊ नका 'या' गोष्टी, लठ्ठपणाचे होऊ शकता शिकार ब्रेकफास्टमध्ये चुकूनही खाऊ नका 'या' गोष्टी, लठ्ठपणाचे होऊ शकता शिकार](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Breakfast.jpg?w=1280)
निरोगी राहण्यासाठी प्रत्येकजण आपल्या आहाराकडे लक्ष देत असतात. तुम्ही दिवसभरात सकाळी नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत जे वेळेत आहार घेतात त्याला फार महत्व आहे. पण यामध्ये तुम्ही सकाळी जो नाश्ता करता तो सर्वात महत्वाचा मानला जातो कारण तुमच्या दिवसाची सुरुवात त्यापासून होते आणि तुम्हाला दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा मिळते. अशातच सकाळचा नाश्ता करताना या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, कारण काही लोकं सकाळी घाईगडबडीत पॅकेज असलेल्या फळांचा ज्युस पितात. ज्याने त्यांचे आरोग्य हेल्दी राहते, असे वाटते. परंतु तुम्हाला माहित आहे का बाजारात मिळणारे प्रोसिड करून पॅक केलेले फळांच्या ज्यूस मध्ये स्वीटनर मिसळले जाते. ज्यामुळे तुम्हाला लठ्ठपणा येतो. त्याचबरोबर पॅक असलेल्या फळांचे ज्युस पिल्याने तुम्हाला थोड्यावेळाने काही खाण्याची इच्छा निर्माण होते. ज्यामुळे तुम्ही बाहेरील जंकफूड खाता आणि त्याने तुमचे वजन वाढते.
आहारावर नियंत्रण ठेवल्याने वजन कमी होते. पण अनेकवेळा लोकं काही अनहेल्दी गोष्टींना हेल्दी मानतात व नाश्त्यात त्या पदार्थांचे सेवन करत असतात. ज्यामुळे वजन वाढण्याच्या समस्या निर्मण होतात. त्यामुळे नाश्त्यामध्ये या काही गोष्टींचे सेवन करणे टाळा.
– हल्ली झटपट नाश्ता तयार करताना ब्रेडचा सार्वधिक वापर केला जातो. त्यामुळे प्रत्येक घरात पाहिले तर बटर टोस्ट ब्रेड खाणे खूप सामान्य आहे, परंतु प्रत्यक्षात ते तुमच्या आरोग्यासाठी फारसे फायदेशीर नाही. बटरमध्ये असलेले फॅटचे प्रमाण खूप जास्त असते, तर ब्रेड पिठापासून तयार केला जातो. अशावेळी तुम्ही रोज नाश्त्यामध्ये बटर टोस्ट ब्रेड खाल्ल्यास तुमचे शरीर फॅटयुक्त होईल. म्हणून रोज ब्रेड खाणे टाळा.
– सकाळी उठल्या उठल्या एक कप चहा पिऊन प्रत्येकजण दिवसाची सुरुवात करतात. पण तुम्ही रोज साखरयुक्त पदार्थ किंवा हाय रिफाईंड शुगर सेरल्स युक्त पदार्थ खाणे टाळे पाहिजे.
– नाश्त्यात कॉफी पिण्याची अनेकांना सवय असते, पण कॉफीमुळे तुमचे आरोग्य बिघडते, कारण तुम्ही कॉफीमध्ये साखर आणि साय मिश्रित कॉफी प्यायली कारण याने वजन झपाट्याने वाढते. त्यामुळे नाश्त्यात कॉफीचे सेवन करणे टाळा.त्या ऐवजी ब्लॅक कॉफी प्या.
– नाश्ता करताना अनेकांना मद्यपान करण्याची सवय असते. परंतु असे करणे टाळा कारण मद्यपान केल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते. तसेच इतर वेळी सुद्धा मद्यपान करू नये त्याने देखील वजन झपाट्याने वाढते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)