वजन कमी करण्यासाठी ‘या’ प्रकारची केळी सर्वोत्तम, वाचा या केळीबद्दल

केळी हे फळ आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. केळीमध्ये पोटॅशियम, मूड-रेगुलेटिंग फोलेट, ट्रायटोफन आणि एनर्जाइजिंग कार्ब्स देखील असतात.

वजन कमी करण्यासाठी 'या' प्रकारची केळी सर्वोत्तम, वाचा या केळीबद्दल
'या'वेळी कधीही खाऊ नका केळी, अवेळी खाल्ल्याने होऊ शकतात समस्या
Follow us
| Updated on: Mar 18, 2021 | 7:35 AM

मुंबई : केळी हे फळ आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. केळीमध्ये पोटॅशियम, मूड-रेगुलेटिंग फोलेट, ट्रायटोफन आणि एनर्जाइजिंग कार्ब्स देखील असतात. हे सर्व वजन कमी करण्यासाठी खूप मदत करतात. मात्र, वजन कमी कोणत्याही केळीने होत नाहीतर योग्य प्रकारच्या केळी खाल्यानेच वजन कमी होते. चला तर मग आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, नेमक्या कोणत्या केळी खाल्याने वजन कमी होते. (Bananas are the best for weight loss)

बाजारातून केळी आणल्यानंतर ते पिवळ्या रंगाचे असतात. मात्र, बाजारातून केळी आणून चार ते पाच दिवस ठेवल्यानंतर केळी पिकते आणि तिच्यावर काळ्या रंगाचे डाग येतात ती केळी वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असते. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी केळीवर काळे डाग आलेली केळी शक्यतो खाल्ली पाहिजे.

केळी पोटॅशियमने समृद्ध आहेत. केळी आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करतात आणि शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. केळीमध्ये 100 कॅलरी उर्जा असते, ज्यामुळे तुमचे शरीर दिवसभर सफुर्तीवान राहते. याव्यतिरिक्त, त्यात असलेले इलेक्ट्रोलाइट्स आणि खनिजे देखील शरीरात रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

केळ्यामध्ये उच्च फायबर असते. म्हणून हिवाळ्यात केळी खाणे फायद्याचे आहे. केळी खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि शरीर निरोगी राहते. केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते, जे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. यामुळे तुमचे हृदयही मजबूत बनवते. केळ्यांसारख्या उच्च फायबरयुक्त पदार्थांना हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी फायदेशीर मानले जाते

बर्‍याच लोकांना झोपेची समस्या असते. कमी झोप लागल्यामुळे बरेच लोक अत्यंत अस्वस्थ असतात. अशा प्रकारच्या समस्येमध्ये केळी खूप फायदेशीर ठरू शकतात. केळी खाण्याने छान झोप लागते. पोटॅशियमयुक्त केळी थकलेल्या स्नायूंना आराम देण्यास मदत करतात. संध्याकाळी उशिरा एक किंवा दोन केळी खाल्ल्यास तुम्हाला रात्रभर चांगली झोप लागते.

संबंधित बातम्या :

(Bananas are the best for weight loss)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.