Health Care : फक्त सर्दीच नव्हेतर अनेक रोगांवर तुळस अत्यंत गुणकारी!
तुळशीला हिंदु धर्मात अत्यंत महत्व आहे. त्याचबरोबर तुळशीला औषधी वनस्पती म्हणून देखील ओळखले जाते. शतकांपासून सर्व रोगांवर उपचार करण्यासाठी याचा वापर केला जात आहे. साधारणपणे लोक तुळशीचा वापर फक्त सर्दी आणि खोकल्यासाठी करतात.
मुंबई : तुळशीला हिंदु धर्मात अत्यंत महत्व आहे. त्याचबरोबर तुळशीला औषधी वनस्पती म्हणून देखील ओळखले जाते. शतकांपासून सर्व रोगांवर उपचार करण्यासाठी याचा वापर केला जात आहे. साधारणपणे लोक तुळशीचा वापर फक्त सर्दी आणि खोकल्यासाठी करतात. मात्र, तुळशीमुळे अनेक आजार आपल्यापासून दूर राहू शकतात. तुळस आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. (Basil for health Extremely beneficial)
1. जर तुम्हाला तुमच्या मेंदूची शक्ती वाढवायची असेल तर तुम्ही रोज तुळशीच्या पानांचे सेवन केले पाहिजे. जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी तुळशीचे सेवन केले तर बुद्धी तीक्ष्ण होते.
2. दम्याची समस्या असल्यास तुळशीच्या पानांचा रस, सुके आले, कांद्याचा रस आणि मध एकत्र करून हे मिश्रण खा. यामुळे दम्याच्या समस्येमध्ये बराच आराम मिळतो. यासोबतच कोरड्या खोकल्याची समस्या देखील दूर होते.
3. जर तुळशीची पाने पाण्यात उकळून नियमित पिली तर ताप आणि विषाणूचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात टाळता येतो. तुळशीमुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत देखील होते.
4. तुळशीची पाने पाण्यात उकळून त्यात हळद आणि खडे मीठ मिसळा. हे पाणी थोडेसे प्या. यामुळे दात, तोंड आणि घशाचे विकार दूर होतात.
5. जर तुम्हाला दातदुखीची समस्या असेल तर तुळशीची पाने आणि काळी मिरी ठेचून गोळ्यासारखे बनवा आणि दाताखाली दाबा. त्याचा रस हळूहळू घ्या. यामुळे दातदुखी नाहीशी होते. पण लक्षात ठेवा तुळस दातांनी चावू नये कारण पानांमध्ये भरपूर लोह आणि पारा असतो. ज्यामुळे आपले दात खराब होतात.
6. जर तुम्हाला किंवा घरातील कोणलाही सर्दीचा त्रास होत असेल तर तुळशीच्या पानांचा रस काढल्यानंतर अद्रकाचा समान रस घ्या आणि दोन्ही मधात मिसळून सेवन करा. असे केल्याने खूप आराम मिळतो.
7. रक्तातील साखरेची पातळी राखण्यास तुळशीचे पाणी मदत करते. शरीरातील साखरेचे ऊर्जेमध्ये परिवर्तित करते. म्हणजेच ब्लड शुगरच्या रुग्णांसाठी तुळशीचे पाणी पिणे अत्यंत फायदेशीर आहे. म्हणून, ज्या लोकांना रक्तातील साखरेची समस्या आहे त्यांना सकाळपासूनच तुळशीचे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.
8. जर तुम्ही दररोज तुळशीच्या पाण्याचे सेवन केले तर तुमच्या शरीरात गॅस व बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. ज्यामुळे पचन क्रिया ठीक राहते. तुळशीच्या पाण्यात अॅसिड रिफ्लेक्स आढळतो, ज्यामुळे पोट स्वच्छ राहते आणि अन्नही योग्य पचते. म्हणूनच, सकाळी उठल्यानंतर एक ग्लास तुळशीचे पाणी प्या.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Basil for health Extremely beneficial)