तुळशीची पाने, लवंग आणि काळे मीठ रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी फायदेशीर !
संपूर्ण देश सध्या कोरोना व्हायरसच्या विरोधात लढत आहे. दररोज येणारी कोरोना रूग्णांची आकडेवारी पाहूण धक्काच बसत आहे.
मुंबई : संपूर्ण देश सध्या कोरोना व्हायरसच्या विरोधात लढत आहे. दररोज येणारी कोरोना रूग्णांची आकडेवारी पाहूण धक्काच बसत आहे. प्रत्येकजण कोरोनापासून दूर राहण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, कोरोनापासून दूर राहण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे की, आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असली पाहिजे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला एक खास पेय सांगणार आहोत. (Basil leaves, cloves and black salt are beneficial for boosting the immune system)
1. सहा ते सात तुळशीची पाने
2. पाच लवंगा
3.एक चमचा आद्रकची पावडर
4. गिलॉय रस एक कप
5. दोन चमचे लिंबाचा रस
6. काळे मीठ
तयार करण्याची पध्दत एक कढई घ्या, त्यात एक ग्लास पाणी, तुळशीची पाने, लवंगा आणि आले घाला. हे मिश्रण उकळा आणि थंड झाल्यावर बाटलीत ठेवा. एक कप गिलॉयमध्ये एक चमचे काळे मीठ, एक चमचे आद्रक, काळे मीठ आणि लिंबू घाला.
पिण्याचे फायदे गिलॉयमध्ये औषधी गुणधर्म आहेत जे रोगांशी लढायला मदत करतात. त्यातील आयुर्वेदिक औषधी वनस्पती संसर्ग दूर ठेवण्यास मदत करतात. आले, तुळस आणि लवंगमध्ये बॅक्टेरियाविरोधी, अँटी-बायोटिक आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. ज्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत होते.
संबंधित बातम्या :
पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!
Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो
Immunity Booster | थंडीच्या दिवसांत आवळ्याचा रस आरोग्यवर्धक, इम्युनिटी वाढवण्यासाठी ‘हे’ नक्की ट्राय करा!https://t.co/XPmKiIDsHE#ImmunityBooster #AmlaJuice
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 28, 2020
(Basil leaves, cloves and black salt are beneficial for boosting the immune system)