वजन आटोक्यात ठेवा, रोगप्रतिकारक शक्ती वाढवा, हिवाळ्यात बाजरीची भाकरी ठरते पौष्टिक

हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेक लोक जेवण्यात बाजरीचा समावेश करतात. बाजरीची भाकरी ही आरोग्यासाठी उत्तम आहे. बाजरीचा आहारात समावेश केल्यामुळे आरोग्य तंदुरुस्त राहते आणि अनेक आजारापासून धोका कमी होतो. बाजरी ही ग्लुटेन फ्री असल्यामुळे ही इतर आरोग्यासाठी कधीही चांगली आहे. बाजरीत भरपूर प्रमाणात कॅल्शियम तसंच व्हिटॅमिन बी, फायबर, प्रथिने, कार्ब्स, लोह, खनिजे आणि फायटेट, फिनॉल आणि टॅनिनसारखे अँटीऑक्सिडंट् असतात. बाजरीही उष्ण असल्याने हिवाळ्यात खाल्ल्याने शरीरात आतून उबदार बनवते. तसंच ही पचन्यास हलकी असते.

वजन आटोक्यात ठेवा, रोगप्रतिकारक शक्ती वाढवा, हिवाळ्यात बाजरीची भाकरी ठरते पौष्टिक
बाजरीची भाकरी
Follow us
| Updated on: Dec 15, 2021 | 8:24 AM

मुंबई : सर्वसामान्य लोकांकडे गव्हाच्या पोळ्या खाल्ल्या जातात. भाकरी म्हटल की तांदळाची भाकरी फेमस आहे. ती सुध्दा अनेक घरांमध्ये बनवली जाते. आजकाल बदललेल्या लाईफ स्टाईलनंतर लोकं आपल्या आरोग्याबद्दल जागृत झाले आहेत. त्यामुळे आता अनेक घरांमध्ये ऑफिस टिफीनमध्ये ज्वारी, बाजरी आणि नाचणी भाकरी दिसून येते. पण हिवाळ्यात खास करुन बाजरीची भाकरी खाल्लली पाहिजे.

बाजरीची भाकरी थंडीत खाल्ल्यामुळे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अनेक लोकं बाजरीच्या भाकरीचा समावेश जेवण्यात करतात त्यामुळे वजन कमी होण्यास फायदा होतो. चला तर मग अशा या पौष्टिक आणि आरोग्यवर्धक बाजरीची भाकरी थंडीत का खातात हे जाणून घेऊयात.

पचनक्रियेशी संबंधित त्रासापासून मुक्तता

फायबरयुक्त असं हे बाजरीचं पीठ ग्लूटेन मुक्त असल्याने आरोग्यास याचा खूप फायदा होतो. बाजरीची भाकरी हिवाळ्यात रोज खाल्ल्यामुळे पोटाशी संबंधित आणि पचनक्रियेशी संबंधित समस्येपासून मुक्तता मिळते. बाजरीची भाकरी पोटाचा विकारापासून सुटण्यासाठी रामबाण उपाय आहे.

बाजरीची भाकरी खा, वजन कमी करा

ज्यांना वजन कमी करायचे आहेत, त्यांनी सर्वप्रथम जेवणात बाजरीच्या पिठापासून तयार केलेली भाकरी खाल्ली पाहिजे. बाजरीची भाकरी खाल्ल्यामुळे आपल्याला पोट भरल्यासारखे वाटतं. त्यामुळे आपण जास्त खाणं टाऴतो. तर प्री-बायोटिक बाजरीत असल्याने मधुमेहाच्या रुग्णांनाही डॉक्टर जेवण्यात बाजरी भाकरी खायला सांगतात.

बाजरीच्या पिठात ओमेगा 3 फॅटी ऍसिडयुक्त

ओमेगा 3 फॅटी अॅसिड हे शरीरासाठी आवश्यक असून पेशी दुरुस्त महत्त्वाची भूमिका बजावतो. हे पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स असून ते फक्त अन्नपदार्थांमधून आपण्यास मिळतं त्यामुळे बाजरीची भाकरी खाल्ल्यामुळे तुमच्या शरीराला ओमेगा ३ मिळतं. इतर धान्यांपेक्षा बाजरीच्या पिठात सर्वात जास्त ओमेगा 3 फॅटी अॅसिड आढळतं.

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत

बाजरी अनेक गुणांनी समृद्ध असून या पिठाचं सेवन केल्यास तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. महत्त्वाचं म्हणजे बाजरीमुळे तुमच्या शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते. त्यामुळे याचा फायदा किडनी आणि यकृताला होतो.

तुमच्या हृदयाची घेतो काळजी

बाजरीत मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम, पोटॅशियम असतात त्यामुळे बीपी आणि हृदयाच्या रुग्णांना डॉक्टर बाजरीची भाकरी खाण्याचा सल्ला देतात. बाजरीत उष्णतेचं प्रमाण जास्त असल्यानं शरीरात ऊर्जा निर्माण होते आणि त्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी कमी राहते.

संबंधित बातम्या :

Sweet Corn Soup : हिवाळ्यात झटपट बनवा गरमागरम कॉर्न सूप, जाणून घ्या खास रेसिपी!

Health Care : शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी या लोह युक्त पदार्थांचा आहारात समावेश करा!

औषधे दूध आणि ज्यूससोबत का घेऊ नयेत? औषधाच्या पानावर का असते लाल रेघ? जाणून घ्या…

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.