Benefits of Potato Leaves | वजन कमी करणे असो किंवा खराब कोलेस्ट्रॉल, अळूच्या पानांचा वापर अनेक समस्यांवर ठरतो उपचार!

Benefits of Potato Leaves | अळूच्या पानांचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. तुम्ही कधी ना कधी या भाजीचे भजे आणि इतर अनेक पदार्थ खाल्ले असतील, पण तुम्हाला माहिती आहे का की, ही पाने आरोग्यासाठीही अनेक प्रकारे फायदेशीर आहेत. जाणून घ्या, याविषयी सविस्तर माहिती.

Benefits of Potato Leaves | वजन कमी करणे असो किंवा खराब कोलेस्ट्रॉल, अळूच्या पानांचा वापर अनेक समस्यांवर ठरतो उपचार!
अळूचे फायदे जाणून व्हाल दंगImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 11, 2022 | 6:46 PM

Benefits of Potato Leaves | अळूच्या पानांपासून बनवलेल्या भाजी आणि भज्यांना कुठेही तोड नाही, प्रत्येकाला त्याची चव आवडते. पण तुम्हाला माहीत आहे का की, ही अप्रतिम पाने आरोग्यासाठीही अनेक प्रकारे फायदेशीर (Beneficial) आहेत. आयुर्वेदानुसार या पानांच्या सेवनाने अनेक आरोग्य समस्या दूर केल्या जाऊ शकतात. अळूची भाजी, अळूच्या वड्या अनेकजण चवीने खातात. अळू आरोग्यासाठीही लाभदायक आहे. या पानांचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. याच्या सेवनाने अनेक आरोग्य समस्यांपासून सुटका होते. हिरव्या पालेभाज्यांचे सेवन आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. यापैकी एक ‘अरबी पाने’ अर्थात ‘अळूची पाने’ ही एक अतिशय आरोग्यदायी भाजी (Healthy vegetables) आहे. हृदयाच्या आकाराच्या अळूच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. भारतीय घरांमध्ये भाजी शिवाय इतर विविध पदार्थांमध्ये देखील ही पाने वापरली जातात. जाणून घ्या, अळूच्या पानांमध्ये लपलेले हे गुणधर्म (These properties are hidden) आणि त्यांचे फायदे.

अळूच्या पानांचे सेवन करण्याचे आरोग्य फायदे

अळूची पाने आपल्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहेत, यामुळे दृष्टी वाढते. हे त्यामध्ये असलेल्या बीटा-कॅरोटीनमुळे होते, जे शरीरात व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित होते. त्यामुळे डोळ्यांच्या समस्या दूर राहतात.

हे सुद्धा वाचा

अळूच्या पानांचे सेवन केल्याने शरीरातील वाढलेले वाईट कोलेस्ट्रॉलही कमी करता येते. संशोधनात असे आढळून आले आहे की अळूच्या वाळलेल्या पानांपासून बनवलेली पावडर लिपिड प्रोफाइल दुरुस्त करू शकते.

अळूचे पान दिसायला अगदी हृदयाच्या आकाराचे असते आणि याच्या सेवनाने तुमचे हृदयही निरोगी राहते. यामध्ये फायबरचे प्रमाण असल्याने हृदयविकाराची शक्यता कमी होते.

अॅनिमिया हा एक आजार आहे जो शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे होतो. त्यामुळे यासाठी तुम्ही अळूच्या पानांचे सेवन करावे कारण त्यात लोहाचे प्रमाण अधिक असते.

अळूच्या पानांच्या सेवनाने रक्तदाबही नियंत्रणात ठेवता येतो. वर नमूद केल्याप्रमाणे, त्यात फायबरचे प्रमाण असते, त्यामुळे ते तुमची पचनसंस्था देखील निरोगी ठेवते. जास्त तेलकट पदार्थांचे सेवन केल्याने शरीरात चरबी जमा होते. अळूच्या पानांमध्ये फारच कमी कॅलरी आढळतात. यात आहारातील फायबर देखील असते, जे वजन कमी करण्यास मदत करते. विविध गुणांनी समृद्ध असल्याने, अळूची पाने शरीराच्या अनेक विकारांवर विजय मिळविण्यास मदत करतात. हे केवळ रक्तातील साखर नियंत्रित करतेच, परंतु डोळ्यांची दृष्टी देखील वाढवते.

रक्ताच्या कमतरतेमुळे वाढणारा अॅमनिमियाचा त्रास रोखण्यास अळू मदत करते. अळूमध्ये नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन सी उपलब्ध असल्याने आयर्न शोषून घेण्याची क्षमतादेखील सुधारते.

बीटा कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ए असल्यामुळे अळूची पाने त्वचा आणि केसांसाठीही खूप फायदेशीर आहेत.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.