Weight Loss : वजन कमी करण्यासाठी काळी मिरी आणि पुदिन्याचे खास पेय पिणे फायदेशीर! 

वाढलेले वजन ही अनेकांची मोठी समस्या झाले आहे. वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे व्यायाम आणि डाएट प्लॅन करण्यात येतात. मात्र, हे सर्व करूनही पाहिजे तसे वजन कमी होत नाही.

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी काळी मिरी आणि पुदिन्याचे खास पेय पिणे फायदेशीर! 
पुदीना आणि तुळस
Follow us
| Updated on: Jul 14, 2021 | 8:04 AM

मुंबई : वाढलेले वजन ही अनेकांची मोठी समस्या झाले आहे. वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे व्यायाम आणि डाएट प्लॅन करण्यात येतात. मात्र, हे सर्व करूनही पाहिजे तसे वजन कमी होत नाही. आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करण्यासाठी एक खास पेय सांगणार आहोत. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होईल. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला काही खर्च देखील येणार नाही. (Black pepper and pudina are beneficial for weight loss)

वाढलेले वजन कमी करण्यासाठी काळी मिरी आणि पुदिना अतिशय फायदेशीर आहे. हे खास पेय घरी तयार करण्यासाठी आपल्याला दोन चमचे काळी मिरी, नऊ-दहा पुदिन्याची पाने आणि दोन चमचे लिंबाचा रस लागणार आहे. सर्वात अगोदर दोन ग्लास पाणी घ्या आणि त्यामध्ये पुदिन्याची पाने आणि काळी मिरी मिक्स करा. साधारण वीस मिनिटे हे पाणी गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा. त्यानंतर त्यामध्ये लिंबाचा रस मिक्स करा आणि प्या. हे पाणी आपण दररोज सकाळी घेतले तर आपले वजन कमी होण्यास मदत होईल.

वाढलेले वजन कमी करण्यासाठी आज आम्ही खास पेय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास नक्की मदत होईल. यासाठी आपल्याला मेथी आणि काळीमिरी लागणार आहे. हे पेय घरी तयार करण्यासाठी दोन चमचे मेथी आणि दोन चमचे काळी मिरी लागणार आहे. हे दोन्ही रात्री एकत्र मिक्स करून पाण्यात भिजू घाला आणि सकाळी एक ग्लास गरम पाण्यात मिक्स करून गॅसवर मंद आचेवर दहा मिनिटे ठेवा. त्यानंतर गरम असतानाच हे पाणी प्या.

सात ते आठ काळी मिरी घ्या आणि एक ग्लास पाणी घ्या. मंद आचेवर पाणी गरम करायला ठेवा. साधारण वीस ते तीस मिनिटे हे पाणी उकळूद्या. त्यानंतर हे पाणी गरम असतानाच प्या. हे पाणी दररोज पिल्याने आपले वजन कमी होण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल. हे चयापचय वाढविण्यास तसेच चरबी कमी करण्यासाठी मदत करते. त्यातील पोषकद्रव्ये आपली भूक शांत ठेवतात आणि वजन कमी करण्यास देखील मदत करतात.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!

(Black pepper and pudina are beneficial for weight loss)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.