अबब, तब्बल 6,750 किलोची खिचडी तयार होणार, अनोखा जागतिक विक्रम येथे होणार

मिलेट्स म्हणजेच भरड धान्यापासून अनोखी खिचडी तयार करण्याचा अनोखा विश्व विक्रम राज्यात होत आहे. मिलेट्सपासून तब्बल 6,750 किलोची खिचडी केली जाणार आहे. या साठी भली मोठी कढई वापरली जाणार आहे. याआधीचा विक्रम नाशिक शहरात साल 2023 रोजी भगरी पासून 6,000 किलोची खिचडी तयार करण्याचा झाला होता.

अबब, तब्बल 6,750 किलोची खिचडी तयार होणार, अनोखा जागतिक विक्रम येथे होणार
millets khichadiImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jan 05, 2024 | 3:13 PM

निलेश डाहाट, टीव्ही 9 मराठी, प्रतिनिधी, चंद्रपूर | 5 जानेवारी 2023 : चांगल्या आरोग्यासाठी भरपूर पोषक तत्वे असलेले मिलेट्स म्हणजेच भरड धान्याचे महत्व अनोखे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साल 2023 हे वर्ष ‘मिलेट्स वर्ष’ ( millets year ) जाहीर केले आहे. या मिलेट्स पासून अनोखी खिचडी तयार केली जाणार आहे. चंद्रपुर शहरात आयोजित चांदा अॅग्रो 2024 मध्ये उद्या प्रसिध्द शेफ विष्णू मनोहर हे ऊर्जा देणारी भरड धान्याची तब्बल 6,750 किलोची खिचडी तयार करणार आहेत. या आधीचा विक्रम एप्रिल 2022 मध्ये भगरीपासून 6,000 किलोची खिचडी तयार करण्याचा आहे.

मिलेट्स म्हणजे भरड धान्य हे पोषक म्हणून परंपरेनुसार आपल्याकडे आहारात वापरले जाते. परंतू हल्लीच्या बदलत्या आहार विहारच्या सवयींमुळे फास्ट फूडकडे लोक आकर्षित होत आहेत. त्यामुळे पुन्हा भरड धान्याकडे लक्ष जाण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या सूचनेवरुन भारताने साल 2023 मिलेट्स वर्षे म्हणून जाहीर केले होते. प्रख्यात शेफ विष्णू मनोहर यांनी भरड धान्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी वर्षभर वेगवेगळ्या शहरात 12 मिलेट्सचे पदार्थ तयार करण्याचा निर्धार केला होता. त्याप्रमाणे आतापर्यंत विष्णू मनोहर यांनी नागपूर, नाशिक, संभाजीनगर येथे मिलेट्सचे विविध पदार्थ तयार केले आहेत. याआधीत नाशिक येथे एप्रिल 2022 मध्ये भगरीपासून 6,000 किलोची खचडी तयार करण्याचा विक्रम झाला होता.

आता चंद्रपुरातील चांदा एग्रो 2024 मध्ये उद्या सकाळपासून चांदा ग्राऊंडवर मिलेट्सची खिचडी बनविण्यास सुरुवात केली जाणार आहे. एका प्रचंड मोठ्या महाकाय कढईत ही खिचडी तयार केली जाणार आहे. या खिचडीसाठी विविध पदार्थांची गरज लागणार असून त्याची यादी जाहीर करण्यात आली आहे. हे पदार्थ खालील प्रमाणे आहेत.

महाकाय खिचडीची खाद्यसामुग्री –

850 किलो बाजरी

250 किलो मुगाची डाळ

215 किलो तांदूळ

215 किलो शेंगदाणे

150 दिडशे किलो फुलकोबी

150 किलो कांदे

150 किलो गाजर

40 किलो भरडलेले धणे

45 किलो तेल अबब…….आणखी काय काय……

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.