Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Clove Tea Benefits : दररोज सकाळी लवंग चहा पिणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा!  

लवंग भारतीय स्वयंपाकघरात वापरली जाते. या मसाल्याचा वापर केवळ त्याचा सुगंध आणि चवसाठीच नाही तर त्याचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध लवंग अतिशय आरोग्यदायी आहे. आरोग्याच्या फायद्यासाठी तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात याचा समावेश करू शकता.

Clove Tea Benefits : दररोज सकाळी लवंग चहा पिणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा!  
चहा
Follow us
| Updated on: Dec 07, 2021 | 7:35 AM

मुंबई : लवंग (Clove Tea) भारतीय स्वयंपाकघरात वापरली जाते. या मसाल्याचा वापर केवळ त्याचा सुगंध आणि चवसाठीच नाही तर त्याचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध लवंग अतिशय आरोग्यदायी आहे. आरोग्याच्या फायद्यासाठी तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात याचा समावेश करू शकता. आपल्या आहारात लवंग चहा समावेश करा. यामुळे आपल्याला अनेक आरोग्य फायदे मिळतील.

लवंग चहा कसा बनवायचा?

लवंग चहा तुमच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. तुम्ही फक्त दोन गोष्टी वापरून घरी बनवू शकता. हा चहा बनवण्यासाठी तुम्हाला 1-4 लवंगा आणि 1 कप पाणी लागेल. एका पातेल्यात एक कप पाणी घालून त्यात लवंग उकळा. 3-5 मिनिटांनी गॅस बंद करा, एक कप चहामध्ये मध मिसळा आणि प्या.

लवंग चहा पिण्याचे फायदे

-लवंगमध्ये अँटिऑक्सिडेंट असतात. जे शरीराला मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानाशी लढण्यास मदत करतात. ते आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.

-लवंगामध्ये अँटीसेप्टिक, अँटीव्हायरल आणि अँटीमाइक्रोबियल गुणधर्म देखील असतात. जे सामान्य संक्रमण, सर्दी आणि खोकला दूर ठेवतात.

-हा चहा प्यायल्याने तुमची पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. निरोगी पचन तुमचे वजन लवकर कमी करण्यास मदत करेल. हे पेय तुमचा चयापचय दर वाढवण्यास देखील मदत करते.

-जर तुम्हाला हिरड्या किंवा दातांच्या दुखण्याने त्रास होत असेल तर लवंग चहा घेणे तुमच्यासाठी चांगले आहे. लवंगात दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे हिरड्यांची जळजळ कमी करतात.

-लवंग चहा देखील छातीत रक्तसंचय किंवा सायनस ग्रस्त लोकांसाठी एक आरोग्यदायी पेय आहे. लवंगात युजेनॉल असते जे कफ साफ करण्यास मदत करते.

-लवंगात व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के असते जे बॅक्टेरियाच्या संसर्गाशी लढण्यास मदत करतात. हे तुमच्या शरीराचे तापमान कमी करण्यास मदत करते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.