Weight Loss : वाढलेले वजन कमी करण्यासाठी नारळाचे दूध अत्यंत फायदेशीर!
नारळाचे दूध आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. नारळाच्या दुधात फॅटी अॅसिडचे प्रमाण चांगले असते. त्यामध्ये असलेले जीवनसत्त्वे सी आणि ई त्वचेला पुनरुज्जीवन देण्यास मदत करतात.
मुंबई : नारळाचे दूध आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. नारळाच्या दुधात फॅटी अॅसिडचे प्रमाण चांगले असते. त्यामध्ये असलेले जीवनसत्त्वे सी आणि ई त्वचेला पुनरुज्जीवन देण्यास मदत करतात. नारळ दूध हे आपल्या त्वचेसाठी एक उत्तम नैसर्गिक मॉश्चरायझर आहे. मात्र, वाढलेले वजन कमी करण्यासाठी नारळाचे दूध अत्यंत फायदेशीर आहे. (Coconut milk is extremely beneficial for weight loss)
-नारळाच्या दुधात संतृप्त चरबी असते. हे कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यास मदत करते. त्यात लॅरिक अॅसिड असते. हे चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते. म्हणूनच, कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी आपण आपल्या आहारात नारळाच्या दुधाचा समावेश करू शकता. दररोज सकाळी सतत एक महिना आपण नारळाचे दूध पिले तर आपले वजन कमी होण्यास मदत मिळते.
-हे दूध घरी तयार करण्यासाठी आपण अर्धा ग्लास नारळाचे दूध घ्यावे. त्यानंतर त्या दूधामध्ये दोन चमचे मध मिक्स करा आणि प्या. यामुळे आपल्या शरीरावरील चरबी कमी होण्यास मदत मिळते. मात्र, दरवेळी नारळाचे दूध हे ताजेच असावे.
-आपल्याला जळजळ होत असेल तर आपण नारळ्याचे दूध हे नेहमी पिले पाहिजे. ज्यामुळे जळजळ कमी होण्यास मदत होते. गरोदर महिलेने तर दिवसातून एकदा तरी नारळाचे दूध पिले पाहिजे. ज्यामुळे बाळाचा त्वचा सुंदर होण्यास मदत होते.
-ओट्स बारीक करून त्याचे पावडर तयार करा. एका भांड्यात एक चमचा ओट्स पावडर घ्या आणि त्यामध्ये आवश्यक प्रमाणात नारळाचे दूध मिसळून पेस्ट तयार करा. काही मिनिटांसाठी हळूवारपणे आपल्या बोटाने चेहरा आणि मान मालिश करा. 20 ही पेस्ट चेहऱ्यावर तशीच ठेवा. आपण हा एक्सफोलिएटिंग नारळ दुधाचा फेसपॅक आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा लागू करू शकता.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Winter Diet | थंडीच्या दिवसांत रिकाम्या पोटी ‘या’ पदार्थांच्या सेवनाने राहील शरीर तंदुरुस्त!https://t.co/Znr5WfzLhp#Winter #diet #Food #health
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 11, 2020
(Coconut milk is extremely beneficial for weight loss)