Weight loss | वजन कमी करण्यासाठी डाएट फाॅलो करतायेत? मग अगोदर तज्ज्ञांचा सल्ला नक्कीच घ्या…
केटोजेनिक डाएट फाॅलो केला तर कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ टाळावेत. त्याऐवजी, अधिक प्रथिने आणि चरबीयुक्त पदार्थ खा. आणि यामुळे शरीरातील ऊर्जेची कमतरता भरून काढण्यासाठी मेंदूची दैनंदिन कामे करण्यासाठी आवश्यक असलेली प्रथिने आणि चरबीयुक्त पदार्थही शरीराला मिळतील.
मुंबई : प्रत्येकाच्या शरीराच्या रचनेनुसार आहाराची (Diet) गरज वेगळी असते. त्यामुळेही स्त्री आणि पुरुष यांच्या शरीराची अन्नाची मागणी वेगळी असते. पुरुषांमध्ये त्यांच्या शरीराच्या रचनेचा भाग म्हणून सरासरी 3 टक्के आवश्यक चरबी असते. शरीरातील (Body) महत्त्वाच्या अवयवांचे संरक्षण, जीवनसत्त्वे साठवणे, पेशींना महत्त्वाचे संदेश पोहोचवणे. या सर्वांसाठी चरबीची आवश्यकता असते. यामुळेच प्रत्येकाचा डाएट प्लॅन (Diet plan) हा त्याच्या शरीरानुसार असतो. प्रत्येकासाठी एकच डाएट प्लॅन कधीही असू शकत नाही. बरेच लोक सध्या वाढलेले वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र, अनेकजण डाॅक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला न घेताच डाएट प्लॅन फाॅलो करतात. यामुळे त्यांना आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
केटो डाएट
केटोजेनिक डाएट फाॅलो केला तर कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ टाळावेत. त्याऐवजी, अधिक प्रथिने आणि चरबीयुक्त पदार्थ खा. आणि यामुळे शरीरातील ऊर्जेची कमतरता भरून काढण्यासाठी मेंदूची दैनंदिन कामे करण्यासाठी आवश्यक असलेली प्रथिने आणि चरबीयुक्त पदार्थही शरीराला मिळतील. डॉक्टरांच्या मते, जेव्हा शरीर केटोसिसमध्ये असते तेव्हा ते भरपूर चरबी बर्न करते आणि आपले वाढलेले वजन झटपट कमी करण्यास मदत करते.
उपवास
अधूनमधून उपवास करणे हा डाएट गेल्या काही वर्षांत खूप लोकप्रिय झाला आहे. वजन कमी झाल्यानंतर थकवा जाणवतो. तसेच मूड खराब होणे, भूक न लागणे, थकवा, नैराश्य या सर्व गोष्टी या डाएटमध्ये होतात. बरेच लोक आठ दिवसातून किमान चार दिवस उपवास पकडतात. यामुळे आरोग्याला हनी होण्याची देखील शक्यता असते.
जीएम डाएट
जीएम डाएटमध्ये 7 दिवसात चरबी कमी होऊ शकते. परंतु त्याचे शरीरावर अनेक परिणाम होतात. अनेक लोक या डाएटमध्ये आजारी देखील पडतात. रक्तदाब कमी होणे, चक्कर येणे हे सर्व याचाच भाग आहे. म्हणूनच हा जीएम डाएट फाॅलो करून नका. जर आपल्याला हा जीएम डाएट फाॅलो करायचाच असेल तर नक्कीच डाॅक्टरांचा सल्ला घ्या.