Coriander Water Benefits : सकाळी रिकाम्या पोटी धने पाणी पिण्याचे काय फायदे आहेत? वाचा!
आपल्या सर्वांना माहीती आहे की, धने पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. विशेषत: भारतीय खाद्यपदार्थांमध्ये धने मोठ्या प्रमाणात वापरली जातात.
मुंबई : आपल्या सर्वांना माहीती आहे की, धने पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. विशेषत: भारतीय खाद्यपदार्थांमध्ये धने मोठ्या प्रमाणात वापरली जातात. हा एक सामान्य मसाला आहे जो जवळ-जवळ सर्व घरांमध्ये आढळतो. संपूर्ण धणे बियाणे बहुधा करी, भाज्या आणि सूप चवीसाठी वापरले जातात. मात्र, तुम्हाला हे माहीती आहे का? की, धने पाणी पिण्यामुळे आपले वाढलेले वजन कमी करण्यास देखील मदत होते. (Coriander Water is beneficial for health)
धने पाणी कसे बनवायचे
हे पाणी बनवण्यासाठी रात्री 1 कप पिण्याच्या पाण्यात 1 चमचे धणे भिजवून ठेवा. हे पाणी सकाळी गाळून घ्या. त्यानंतर तुम्ही पाणी पिऊ शकता. या बिया सुकवून तुम्ही करी वापरू शकता.
रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी – धणे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. त्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करण्यास मदत करतात. हे संक्रमण आणि इतर अनेक आजार होण्यापासून प्रतिबंधित करते.
निरोगी पाचन तंत्र – धन्यामध्ये असे गुणधर्म आहेत, जे तुमची पचनसंस्था निरोगी बनवते. तसेच पचनाशी संबंधित अनेक आजार बरे करण्यास मदत करते. सकाळी त्याचे सेवन केल्याने पचनसंस्था निरोगी राहते. हे चयापचय वाढवते. यामुळेच वजन कमी होण्यास मदत होते.
केसांना बळकट करते – धन्यामध्ये व्हिटॅमिन के, सी आणि ए भरपूर प्रमाणात असते. हे केस मजबूत करण्यास आणि वाढण्यास मदत करते. केसांसाठी तुम्ही धणे तेल किंवा हेअर मास्क वापरू शकता.
मुरुमे आणि चट्टे कमी करते – धन्यामध्ये लोह भरपूर असते. यात बुरशीविरोधी, बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आहेत. धने पाण्याच्या सेवनाने चेहरा चमकदार होतो. हे आपली त्वचा स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यास मदत करते.
विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत – धने पाणी तुमच्या शरीरातून विष बाहेर काढण्यास मदत करू शकते. तुम्ही सकाळी धने पाणी पिऊन तुमची प्रणाली डिटॉक्स करू शकता.
इतर काही फायदे – सकाळी धने पाणी प्यायल्याने तुम्ही ऊर्जावान राहता. ते तुमच्या शरीराला डिटॉक्स करते. त्यातून तुम्हाला निरोगी वाटते. मधुमेहाने ग्रस्त लोकांनी सकाळी धने पाणी पिण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, कारण यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते आणि हायपोग्लाइसीमिया होऊ शकतो.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Winter Diet | थंडीच्या दिवसांत रिकाम्या पोटी ‘या’ पदार्थांच्या सेवनाने राहील शरीर तंदुरुस्त!https://t.co/Znr5WfzLhp#Winter #diet #Food #health
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 11, 2020
(Coriander Water is beneficial for health)