Belly fat : ‘हे’ योगासन करा आणि पोटावरची चरबी झटपट कमी करा!

कोरोनाच्या काळात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक झाले आहे. त्यामध्येही फक्त हेल्दी आहाराच घेणे महत्वाचे नसून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व्यायामामही महत्वाचा आहे.

Belly fat : 'हे' योगासन करा आणि पोटावरची चरबी झटपट कमी करा!
निरोगी आयुष्य
Follow us
| Updated on: Jun 25, 2021 | 7:38 AM

मुंबई : कोरोनाच्या काळात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक झाले आहे. त्यामध्येही फक्त हेल्दी आहाराच घेणे महत्वाचे नसून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व्यायामामही महत्वाचा आहे. मात्र, हेल्दी आहार खाण्याच्या नादामध्ये आपण गरजेपेक्षा अधिक अन्न खात आहोत. ज्यामुळे वजन वाढतच चालले आहे. कोरोनामुळे घराच्या बाहेर जाणे टाळतो आणि यामुळे कॅलरी देखील बर्न होत नाहीत आणि वजन वाढते. (Do this yoga pose to reduce belly fat)

या काळात घरात राहून वजन कमी करण्यासाठी विशेष: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी आज आम्ही खास टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल. अर्धचतुराआसन केल्यास पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. या व्यतिरिक्त असे केल्याने पोट, कंबर आणि हात यांचे स्नायू बळकट होतात. हे आपले शरीर लवचिक ठेवते. अर्धचतुराआसन करण्यासाठी सर्वात अगोदर पोटावर झोपा.

दोन्ही हात शरीराच्या जवळ घ्या आणि हानवटी जमीनीवर ठेवा त्यानंतर दोन्ही हात कमरेशेजारी आणा आणि शरीर दोन्ही हाताने कमरेपासून जेवढे शक्य आहे, तेवढेवरती उचलण्याचा प्रयत्न करा. यामुळे आपल्या पोटावर अतिरिक्त ताण येतो आणि पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होते. हे आसन आपण दररोज केल्याने आपल्या पोटावरची चरबी एका महिन्यामध्ये कमी होण्यास मदत होते.

शरीरात कोर्टीसोलची पातळी उच्च असल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. ताण कमी करण्यासाठी, दररोज 10 मिनिटे ध्यान किंवा योग करा. ताण कमी करण्यासाठी कपालभारती देखील फायदेशीर आहे. कपालभारतीमुळे आपल्या पोटाची हालचाल मोठ्या प्रमाणात होते आणि कपालभारती आपल्या आरोग्यासाठी देखील तेवढेच फायदेशीर आहे. मात्र, कपालभारती करण्याच्या अगोदर तीन तास आपण काहीच खाल्ले पाहिजे नाही. यामुळे शक्यतो सकाळी कपालभारती केलेले कधीही चांगले.

संबंधित बातम्या : 

Raisins | दररोज प्या मनुक्याचे पाणी, शरीराला होतील ‘हे’ जबरदस्त फायदे!

Turmeric Side Effects | पोटाच्या समस्यांपासून ते मुतखड्यापर्यंत, ‘हळदी’च्या अतिसेवनाने होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम!

(Do this yoga pose to reduce belly fat)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.