आता चहा, कॉफीची सवय सोडा, ‘हे’ प्रोटीनयुक्त शेक प्या; रोगप्रतिकारक शक्तीही वाढवा

सध्याच्या वाढलेल्या कोरोना परिस्थितीमध्ये तर हेल्दी डाएट घेतला पाहिजे. कारण हेल्दी डाएटमुळे आपण आजारांना आपल्यापासून दूर ठेऊ शकतो.

आता चहा, कॉफीची सवय सोडा, 'हे' प्रोटीनयुक्त शेक प्या; रोगप्रतिकारक शक्तीही वाढवा
प्रोटीनयुक्त शेक
Follow us
| Updated on: May 22, 2021 | 4:42 PM

मुंबई : सध्याच्या वाढलेल्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये हेल्दी डाएट घेतला पाहिजे. कारण हेल्दी डाएटमुळे आपण आजारांना आपल्यापासून दूर ठेऊ शकतो. प्रत्येक दिवशी कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळे या दिवसात आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे अत्यंत महत्वाचे आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण आहारात प्रोटीनयुक्त अन्न घेतले पाहिजे. (Drink protein shakes to boost the immune system)

प्रोटीन शेक जर तुम्हाला सकाळी कॉफी किंवा चहा पिण्याची सवय असेल तर ही सवय बदलली पाहिजे. चहा आणि कॉफी पिणे आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. चहा-कॉफीऐवजी प्रोटीन शेक पिऊ शकता. केळी, सफरचंद, बदाम, काजू यासह दूध मिसळून त्याचा शेक अर्थात ज्यूस बनवून पिऊ शकता. हे पिणे आपल्या आरोग्याासाठी खूप फायदेशीर आहे. हे पिल्याने फक्त रोगप्रतिकारक शक्तीच नाहीतर अनेक आजार आपल्यापासून दूर राहतील.

केळीचा शेक केळीमध्ये 100 कॅलरी उर्जा असते, ज्यामुळे तुमचे शरीर दिवसभर सफुर्तीवान राहते. या व्यतिरिक्त, त्यात असलेले इलेक्ट्रोलाइट्स आणि खनिजे देखील शरीरात रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. केळी ही आपल्या आरोग्यासाठी चांगल्या असणाऱ्या फळांपैकी एक आहे. केळ्यात अँटीऑक्सिडंट्स, पाण्याचे आणि फायबरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. यामुळे केळी शेक घेणे आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप चांगले आहे.

सफरचंद शेक आपल्या सर्वांना माहित आहे की सफरचंद खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जे लोक दिवसातून एकदा सफरचंद खातात, त्यांना कधीही डॉक्टरकडे जाण्याची गरज नसते, असा सल्ला खुद्द डॉक्टरही देतात. सफरचंदांमध्ये अनेक जीवनसत्त्वे असतात, जे आपली प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यास मदत करतात. सफरचंदामध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि लोह हे घटक मुबलक प्रमाणत आढळतात. यामुळे सफरचंदचा शेक घेतला पाहिजे.

बदाम शेक बदामामध्ये आरोग्यास पोषकघटकांचा समावेश असल्यानं डॉक्टर आपल्याला त्याचे नियमित सेवन करण्याचा सल्ला देतात. आकारानं छोट्या असलेल्या या सुकामेव्याचे शरीराला होणारे फायदे आश्चर्यकारक आहेत. बदामामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर आणि ओमेगा ३ हे घटक आहेत. बदामामध्ये प्रथिने, अँटी-ऑक्सिडंट्सही असतात. शिवाय कॅलरीचं प्रमाण कमी असतं. यामुळे सध्याच्या कोरोनाच्या काळात आपण आहारात बदाम शेकचा समावेश केला पाहिजे.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Lipstick shades | तुमच्या चेहऱ्यासाठी लिपस्टिकचा कोणता रंग ठरेल सर्वोत्तम? जाणून घ्या…  

आकर्षक वनस्पतींनी खुलवा घरांची सजावट, जाणून घ्या कशी करायची देखभाल?

(Drink protein shakes to boost the immune system)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.