Belly Fat : पोटावरची चरबी कमी करण्यासाठी दररोज सकाळी प्या ‘हे’ खास पेय!

वाढलेले वजन कमी करणे सोप्पे आहे. मात्र, पोटावर वाढलेले चरबी कमी करणे थोडे जास्त अवघड आहे. कारण अनेक उपाय करूनही पोटावरची चरबी कमी होत नाही.

Belly Fat : पोटावरची चरबी कमी करण्यासाठी दररोज सकाळी प्या 'हे' खास पेय!
खाय पेय
Follow us
| Updated on: Jul 19, 2021 | 7:04 AM

मुंबई : वाढलेले वजन कमी करणे सोप्पे आहे. मात्र, पोटावर वाढलेले चरबी कमी करणे थोडे जास्त अवघड आहे. कारण अनेक उपाय करूनही पोटावरची चरबी कमी होत नाही. आज आम्ही तुम्हाला एक खास पेय सांगणार आहोत. ज्यामुळे पोटावरची चरबी कमी होण्यास नक्की मदत होईल. विशेष म्हणजे हे खास पेय घरी तयार करण्यासाठी तुम्हाला विशेष काही वेळही लागणार नाहीये. (Drink this drink every morning to reduce belly fat)

आपल्या सर्वांना माहीती आहे की, कोथिंबीर खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. कोथिंबीर शिवाय आपली कुठलीच भाजी पूर्ण होत नाही. कोथिंबीरमध्ये मुबलक प्रमाणात लोह, खनिजे, जीवनसत्त्वे अ आणि सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे शरीरात रक्ताची कमतरता भरून काढण्यात मदत करतात. तसेच बर्‍याच रोगांपासून आराम देतात. विशेष म्हणजे कोथिंबीर वजन कमी करण्यासाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे.

आपण जर कोथिंबीरचे खास पेय दररोज सकाळी घेतले तर आपले वजन कमी होण्यास मदत होईल. हे खास पेय घरी तयार करण्यासाठी आपल्याला सहा ते सात कोथिंबीरची पाने, मध आणि आद्रक लागणार आहे. सर्वात अगोदर एक ग्लास पाणी घ्या आणि त्यामध्ये आद्रक मिक्स करा. वीस मिनिटे हे पाणी गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा. त्यानंतर यामध्ये मध मिक्स करून गरमा-गरम प्या.

हे पाणी दररोज सकाळी रिकाम्या पोटी घेतल्याने आपल्या शरीरावरील चरबी कमी होण्यास मदत होते. तसेच यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. जर आपले पोट वारंवार खराब होत असेल, तर आपण कोथिंबीर युक्त चहाचे सेवन करा. यासाठी कोथिंबीरची काही पाने धुवून पाण्यात ठेवा. यानंतर अर्धा चमचा जिरे आणि बडीशेप घाला. यानंतर, हे भांडे उकळण्यासाठी ठेवून त्यात थोडासे आले आणि पाव चमचा चहापत्ती घाला.

यानंतर ही चहा गाळून घेऊन त्यात थोडा मध घालून प्या. यामुळे पचनशक्ती सुधारते आणि गॅस, आंबटपणा, अपचन यासारख्या सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते. तसेच, यकृत देखील चांगले कार्य करते. कोथिंबीर मधुमेहाच्या रूग्णांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. मधुमेह रूग्णांनी नियमितपणे याचे सेवन केल्यास भरपूर आराम मिळतो. कोथिंबीर रक्तातील इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रित करते.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Drink this drink every morning to reduce belly fat)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.