वाढलेले वजन कमी करण्यासाठी ‘हे’ खास 5 पेय प्या आणि वजन कमी करा
वाढलेले वजन ही अनेकांची मोठी समस्या झाले आहे. वजन कमी करण्यासाठी लोक अनेक प्रयत्न देखील करतात. मात्र, वजन काही कमी होत नाही. कारण आपण योग्य पध्दतीने व्यायाम आणि डाएट करत नाहीत.
मुंबई : वाढलेले वजन ही अनेकांची मोठी समस्या झाले आहे. वजन कमी करण्यासाठी लोक अनेक प्रयत्न देखील करतात. मात्र, वजन काही कमी होत नाही. कारण आपण योग्य पध्दतीने व्यायाम आणि डाएट करत नाहीत. वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे की, आपण काय खातो आणि पितो. वजन कमी करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही खाय पेय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचे वजन झटपट कमी होईल. (Drink this special 5 drink to lose weight)
वजन कमी करण्यासाठी आद्रक, काकडी, जिरे आणि दालचिनीचे खास पेय घरी तयार करण्यासाठी सर्वात अगोदर दोन ग्लास पाणी घ्या. त्यामध्ये आद्रक, काकडी, जिरे आणि दालचिनी मिक्स करा आणि साधारण अर्धा तास ते पाणी उकळूद्या. त्यानंतर थोडे थंड झाल्यानंतर हे पाणी प्या. यामुळे आपले वजन कमी करण्यास खूप मदत होईल. हे पेय दररोज सकाळी रिकाम्या पोटी पिल्याने आपल्या शरीरावरील चरबी बर्न होण्यास मदत होते.
कमी वेळात वजन कमी करायचे असेल, तर दालचिनी युक्त चहाचे सेवन करण्यास सुरुवात करा. दालचिनी चहा वजन नियंत्रणासाठी सर्वोत्तम नैसर्गिक पेय मानला जातो. या चहामध्ये अनेक अँटिऑक्सिडेंट आणि अँटीबायोटिक गुणधर्मांसह चयापचय वाढवणारा गुणधर्म देखील आहे. ज्यामुळे तो एक चांगला डीटॉक्स पेय देखील बनतो. दालचिनी चहाचे सेवन केल्यास चरबी लवकर बर्न होण्यास मदत होते.
सात ते आठ काळी मिरी घ्या आणि एक ग्लास पाणी घ्या. मंद आचेवर पाणी गरम करायला ठेवा. साधारण वीस ते तीस मिनिटे हे पाणी उकळूद्या. त्यानंतर हे पाणी गरम असतानाच प्या. हे पाणी दररोज पिल्याने आपले वजन कमी होण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल. हे चयापचय वाढविण्यास तसेच चरबी कमी करण्यासाठी मदत करते. त्यातील पोषकद्रव्ये आपली भूक शांत ठेवतात आणि वजन कमी करण्यास देखील मदत करतात. यामुळे खाद्यपदार्थांमध्ये हिरव्या मिरचीपेक्षा लाल मिरचीचा वापर केला पाहिजे.
हे पेय आपण दररोज पिले तर आपले वजन कमी होण्यास नक्कीच मदत होईल. यासाठी आपल्याला एक लिंबू, हळद, काळी मिरी आणि गरम पाणी लागणार आहे. यासाठी सर्वात प्रथम पाणी गरम करण्यासाठी मंद आचेवर ठेवा आणि त्यामध्ये काळी मिरी, हळद मिक्स करा, पाणी चांगले उकळूद्या आणि शेवटी यामध्ये लिंबू मिक्स करा. हे पाणी पिल्याने आपले वजन कमी होण्यास मदत होईल. दिवसातून एक वेळा तरी हे पाणी घेतले पाहिजे.
ओव्याचे पाणी पोट कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. एका ग्लास पाण्यात एक मोठा चमचा ओवा घालून ते पाणी उकळा. नंतर ते पाणी कोमट करून प्या. आपण इच्छित असल्यास, ते एकाचवेळी मोठ्या प्रमाणात तयार करू शकता आणि ते एका भांड्यात ठेवू शकता. त्यानंतर, आपण दिवसभरात कधीही हे पाणी पिऊ शकता असे केल्याने, लवकरच आपल्याला चांगले परिणाम दिसतील. जर, आपण दिवसभर हे पाणी पिऊ शकत नसाल, तर किमान सकाळी रिक्त पोटी आणि जेवणानंतर नक्की प्या.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Drink this special 5 drink to lose weight)