चमकदार आणि हेल्दी त्वचा पाहिजे?, मग दररोज सकाळी एक ग्लास पाणी प्या!

चमकदार आणि हेल्दी त्वचा मिळवण्यासाठी आपण सर्वजण वेगवेगळे प्रयत्न करतो. मात्र, आपण आपल्या दररोजच्या काही सवयींमध्ये बदल केला तरी देखील आपल्याला हवी तशी त्वचा मिळू शकते.

चमकदार आणि हेल्दी त्वचा पाहिजे?, मग दररोज सकाळी एक ग्लास पाणी प्या!
पाणी
Follow us
| Updated on: Jun 27, 2021 | 5:47 PM

मुंबई : चमकदार आणि हेल्दी त्वचा मिळवण्यासाठी आपण सर्वजण वेगवेगळे प्रयत्न करतो. मात्र, आपण आपल्या दररोजच्या काही सवयींमध्ये बदल केला तरी देखील आपल्याला हवी तशी त्वचा मिळू शकते. विशेष म्हणजे यासाठी आपल्याला कुठल्याही क्रीम आणि उपाय न करता. जर चमकणारी आणि निरोगी त्वचा हवी असेल तर, दररोज सकाळी लवकर उठा आणि रिकाम्या पोटी एक ग्लास पाणी प्या. (Drink water every morning and get beautiful skin)

सकाळी पाणी पिल्यामुळे आपल्या शरीरातून हानिकारक पदार्थ निघून जाता, आणि आपल्या त्वचेला एक नैसर्गिक चमक मिळते. खरे तर, निरोगी आणि चमकणारी त्वचा मिळविण्यासाठी फक्त सकाळीच नव्हे तर, दररोज दिवसांतून किमान 3 ते 4 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. पाण्यामुळे आपली त्वचा अधिक चमकदार बनते, त्वचेवरील छिद्रे गायब होतात. त्वचेला विशिष्ट प्रकारचा ब्राईट कलर येतो, आपल्या शरिरातील टॉक्सिन्स बाहेर फेकले जातात. पाणी त्वचेला नैसर्गिक रुपाने हायड्रेटेड आणि मॉईस्चराइज ठेवते.

सकाळी पाणी पिण्याचा खूप फायदा होतो. पाणी आपल्या मेटाबॉलिज्मचा रेट वाढवण्यास मदत करते. आपल्या मेटाबॉलिज्ममध्ये वाढ होण्याचा अर्थ म्हणजे आपण दैनंदिन ज्यादा कॅलरी बर्न करीत आहोत. भूक कमी अर्थात पोटात जेवण कमी जात असेल तर पाणी प्यायला आहे. त्यामुळे पोट भरलेले राहते. त्वचा निरोगी आणि चमकदार होण्यासाठी नेहमी व्यायाम करण्याची सवय लावून घ्या. कसरत करण्याची सवय कधीही सोडू नका.

घामातून अतिरिक्त चरबी निघून गेल्याने शरीर निरोगी होते. तसेच, आपल्याला चमकणारी आणि निरोगी त्वचा प्राप्त होते. व्यायामामुळे त्वचेतील कोलेजेनचे उत्पादन सुधारते. पाण्याची हायड्रेशनसाठी मोठी मदत होते. त्यातूनच लाळ बनण्याची महत्त्वपूर्ण प्रक्रिया पूर्ण होते. आपल्या तोंडात लाळ बनणे महत्त्वपूर्ण आहे. कारण तोंड जर कोरडे असेल तर आपल्याला कोरड्या तोंडावाटे आजारपण येऊ शकते. यातून मधुमेहासारख्या गंभीर आजारालाही निमंत्रण मिळू शकते.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Drink water every morning and get beautiful skin)

Non Stop LIVE Update
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका.
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?.
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?.
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.