कोरफडचा रस प्या आणि वाढवा रोगप्रतिकारक शक्ती, वाचा याबद्दल अधिक !

आयुर्वेदात सुपरफूड ‘कोरफड’चे बरेच फायदे सांगितले गेले आहेत. शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढविणे, पोटाच्या समस्या आणि त्वचेच्या समस्या कमी करण्यात खूप फायदा होतो.

कोरफडचा रस प्या आणि वाढवा रोगप्रतिकारक शक्ती, वाचा याबद्दल अधिक !
कोरफड
Follow us
| Updated on: Apr 18, 2021 | 10:58 AM

मुंबई : आयुर्वेदात सुपरफूड ‘कोरफड’चे बरेच फायदे सांगितले गेले आहेत. शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढविणे, पोटाच्या समस्या आणि त्वचेच्या समस्या कमी करण्यात खूप फायदा होतो. यामुळे बरेच लोक रस, भाजी किंवा इतर आणखी प्रकारे कोरफडचे सेवन देखील करतात. मात्र, सध्याच्या वाढलेल्या कोरोना काळात तर कोरफडचा रस पिणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. दररोज तुम्ही कोरफडचा रस पिलातर कोरोनापासून दूर राहण्यासाठी तुम्हाला मदत होईल. (Drinking aloe vera juice is beneficial for health)

कोरफडाच्या पानांमध्ये ए, बी1, बी2, बी3, बी6, बी12, सी, ई आणि फॉलिक अॅसिड यांसारखी पोषक तत्व आढळतात. आरोग्याच्या दृष्टीने कोरफडाची पाने ही नैसर्गिकरित्या प्रभावशाली आयुर्वेदीक वनस्पती आहे. उपासी पोटी कोरफडचा रस पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढतेच आणि आपले वाढलेले वजन देखील कमी होण्यास मदत होते.

कोरफडचा रस पिण्यासाठी शक्यतो ताजीच कोरफड असणे आवश्यक आहे. कारण ताज्या कोरफडने आपल्याला जास्त फायदा होऊ शकतो. कोरफडचा रस पिण्यासाठी थोडा कडु असला तरी तो आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. विशेष म्हणेज कोणत्याही वयोगटातील लोक कोरफडचा रस पिऊ शकतात.

कोरफडचा रस तयार करण्यासाठी सर्वांत अगोदर ताजी कोरफड घ्या. ती स्वच्छा धुवा आणि कापा त्यामधील गर काढा आणि बारीक करू घ्या. त्यामध्ये थोडे पाणी घ्याला आणि तसाच प्या. मात्र, कोरफडचा रस पिल्यानंतर किमान एक ते दोन तास काहीही खाऊ नका.

कोरफडीच्या औषधी गुणांमुळे खरचटल्यास, कापल्यास, भाजल्यास किंवा एखादा किडा चावल्यास प्रथमोपचार म्हणून कोरफडचा वापर केला जातो. जगभरात कोरफडीच्या तब्बल 400हून अधिक प्रजाती आढळतात. परंतु, त्यापैकी केवळ 5 प्रजाती वापरल्या जातात. कोरफडात असलेल्या गुणांमुळे केस दाट आणि सुंदर होण्यास मदत होते.

हे लक्षात ठेवा

-कोरफडचे जास्त वेळा किंवा चुकीच्या पद्धतीने सेवन केल्यास शरीरातील पोटॅशियमची पातळी कमी होते. यामुळे हृदयाचा गतीमध्ये अनियमितता आणि अशक्तपणा या समस्या होऊ शकतात.

-जर, आपण गॅसच्या समस्येस झगडत असाल, तर कोरफडचे सेवन करू नका. यामुळे अडचणी वाढू शकतात. 12 वर्षाखालील मुलांनी कोरफडचे सेवन करणे टाळले पाहिजे.

-जर, आपण कुठलेही औषधे घेत असाल, तर कृपया कोरफड सेवन करण्यापूर्वी एकदा तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कारण कोरफडमध्ये आढळणारे लॅक्टोस औषधांना शरीरात शोषून घेण्यापासून देखील प्रतिबंधित करतो.

-कोरफड रस प्यायल्याने कधीकधी अॅलर्जी, त्वचेवर पुरळ, अंगावर उठणाऱ्या पित्ताच्या गाठी, खाज सुटणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. भरपूर कोरफड रस प्यायल्याने आपल्या मूत्रपिंडाचे नुकसान देखील होऊ शकते.

(टीप : सदर लेख संशोधनावर आधारित असून, कुठल्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

(Drinking aloe vera juice is beneficial for health)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.