वाढलेले वजन कमी करण्यासाठी दररोज सकाळी प्या बीट आणि पपईचा रस, वाचा!
वाढलेले वजन ही अनेकांची मोठी समस्या झाले आहे. आज प्रत्येकाला वजन कमी करायचे आहे. मात्र, अनेक उपाय करूनही वजन कमी होत नाहीये.
मुंबई : वाढलेले वजन ही अनेकांची मोठी समस्या झाले आहे. आज प्रत्येकाला वजन कमी करायचे आहे. मात्र, अनेक उपाय करूनही वजन कमी होत नाहीये. वजन वाढल्यामुळे अनेक आजारांना आपण निमंत्रणच देत असतो. त्यामध्ये कोरोनामुळे लोक घराच्या बाहेर जाणे टाळत आहेत. त्यामुळे सतत घरातमध्ये बसल्यामुळे आणि हलचाली कमी होत असल्यामुळे वाढलेले वजन मोठी समस्या बनले आहे. (Drinking beet and papaya juice is beneficial for weight loss)
आज आम्ही वजन कमी करण्यासाठी खास दोन रस सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचे वजन झटपट कमी होण्यास मदत होईल. बीट शरीरातील हिमोग्लोबिन वाढवते आणि रक्त शुद्ध करते. त्यात आढळणारे अँटिऑक्सिडेंटस शरीराला रोगांशी प्रतिकार करण्याची क्षमता देतात. याबरोबरच नायट्रेट, बेटेन, मॅग्नेशियम, फॉस्फरस, सोडियम, व्हिटामिन बी 1, बी 2 आणि सी हे तत्व बीटाचे औषधी गुणधर्म वाढवतात.
बीटचा रस आपण जर दिवसातून दोनदा घेतला तर आपले वजन कमी होण्यास नक्की मदत होईल. जर आपण वजन कमी करण्यासाठी प्लान करीत असाल तर आपण पपईचा रस आवश्यक आहे. पपईमध्ये असलेले फायबर्स तुमचे वजन कमी करण्यास मदत करतात. पपईचा रस पिल्याने पोटही पटकन भरते, म्हणून जर तुम्ही सकाळी उठून पपईचा रस पिलातर तुम्हाला दिवसभर फार भूक लागणार नाही आणि आपण जास्त खाण्याचा प्रयत्न करणार नाही.
विशेष म्हणजे पपईचा रस पिल्याने बराच वेळ आपले पोट भरल्यासारखे वाटते आणि आपल्याला भूक देखील लागत नाही. पपईमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन-ए असते. व्हिटॅमिन-एच्या सेवनाने दृष्टी वाढते. म्हणूनच, औषधे घेण्याऐवजी आपण नैसर्गिक उपायांनी सहजपणे दृष्टी वाढवू शकता, म्हणून या दिवसात नियमितपणे पपईचे सेवन करा. आपली प्रतिकारशक्ती चांगली असणे हे खूप महत्वाचे आहे.
संबंधित बातम्या :
Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता
Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Drinking beet and papaya juice is beneficial for weight loss)