दररोज सकाळी एक ग्लास दूध आणि तीन भिजवलेले बदाम खा आणि निरोगी आयुष्य जगा!
निरोगी आणि तंदुरूस्त आयुष्य जगण्यासाठी आज प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. मात्र, सध्याच्या बदलेल्या जीवनशैलीमुळे आपण म्हणावे तसे आरोग्याकडे लक्ष देऊ शकत नाही.
मुंबई : निरोगी आणि तंदुरूस्त आयुष्य जगण्यासाठी आज प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. मात्र, सध्याच्या बदलेल्या जीवनशैलीमुळे आपण म्हणावे तसे आरोग्याकडे लक्ष देऊ शकत नाही. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. निरोगी आयुष्य आपल्याला जगायचे असेल तर आपण दररोज सकाळी एक ग्लास दूध आणि तीन भिजवलेले बदाम खाणे फायदेशीर आहे. (Drinking milk and eating 3 almonds every morning is beneficial for health)
दूध हे जरी एक पेय असले, तरी दुधाला संपूर्ण अन्न मानले जाते. दूध हा भारतीय अन्नाचा एक महत्त्वाचा भाग आहे, जो दुधाच्या रूपातच सेवन केला जातो आणि त्यातून बरेच प्रकारची उत्पादनेही तयार केली जातात. केवळ कॅल्शियमच नाही तर दुधात प्रथिने, जीवनसत्त्वे ए, बी 1, बी 2, बी 12 आणि डी, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारख्या अनेक पोषक घटक असतात.
या कारणास्तव, ते एक संपूर्ण अन्न मानले जाते. पाचन आणि पौष्टिक गुणधर्मांसाठी दुधाचे आयुर्वेदात विशेष स्थान आहे. बदामामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर आणि ओमेगा 3 हे घटक आहेत. बदामामध्ये प्रथिने, अँटी-ऑक्सिडंट्सही असतात. शिवाय कॅलरीचं प्रमाण कमी असतं. शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी बदाम खाणे फायद्याचे ठरते. बदामामुळे आपल्या मेंदूच्या आरोग्याला जास्त प्रमाणात फायदा होतो.
भिजलेल्या बदामामध्ये फायबर, प्रथिने, व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियम भरपूर असतात. त्याच्या वापरामुळे प्रतिकारशक्ती वाढविली जाते. कोरोना कालावधीत त्याचे सेवन केल्याने आपण फिट राहू शकता. बदाम पचविणे एवढे सोपे नाही. पण भिजवलेले बदाम सहज पचतात. याव्यतिरिक्त, हे एंजाइमचे उत्पादन वाढवते, जे पाचन तंदुरुस्त ठेवते. बदामामधील मोनोसॅच्युरेटेड फॅट्स भूकेवर नियंत्रण आणतात.
यामुळे आपल्याला वारंवार भूक लागत नाही. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. बरेचदा लोक म्हणतात की बदाम खा. हे खरं आहे की बदाम खाण्याने मेंदू वेगाने काम करतो. भिजवलेल्या बदामांमध्ये आढळणारे व्हिटॅमिन ई मध्ये संज्ञानात्मक घट रोखण्याची आणि स्मरणशक्ती वाढविण्याची क्षमता आहे.
संबंधित बातम्या :
Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता
Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Drinking milk and eating 3 almonds every morning is beneficial for health)