Health | उन्हाळ्यात ही 4 खास पेय प्या, फक्त थंडावाच नाही तर अनेक आजारही दूर राहण्यास मदत होईल!
उन्हाळ्याच्या (Summer) हंगामामध्ये आरोग्याबरोबरच आपल्या आहाराकडेही जास्त लक्ष द्यावे लागते. तीव्र सूर्यप्रकाश आणि घामामुळे लोकांना सुस्त आणि थकवा जाणवतो. या काळात निर्जलीकरण होणे देखील मोठी समस्या आहे. उन्हाळ्यात अनेक प्रकारचे थंड आणि आरोग्यदायी (Health) पेयांचा आहारामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश केला जातो.

मुंबई : उन्हाळ्याच्या (Summer) हंगामामध्ये आरोग्याबरोबरच आपल्या आहाराकडेही जास्त लक्ष द्यावे लागते. तीव्र सूर्यप्रकाश आणि घामामुळे लोकांना सुस्त आणि थकवा जाणवतो. या काळात निर्जलीकरण होणे देखील मोठी समस्या आहे. उन्हाळ्यात अनेक प्रकारचे थंड आणि आरोग्यदायी (Health) पेयांचा आहारामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश केला जातो. ही पेये उष्णतेपासून आराम देण्याचे काम करतात, ते शरीर थंड ठेवतात. ते तुम्हाला दिवसभर उत्साही ठेवतात. ते शरीराला हायड्रेट ठेवतात. त्यात कॅलरीजचे (Calories) प्रमाणही जास्त नसते. या पेयांमध्ये ताक, लस्सी, जलजीरा आणि बेल ज्यूस इत्यादींचा समावेश होतो. या पेयांमध्ये जीवनसत्त्वे, पोटॅशियम, सोडियम, मॅग्नेशियम आणि लोह असते, यामुळे यांचा आहारामध्ये समावेश करणे महत्वाचे आहे.
ताक
ताक म्हणा किंवा मठ्ठा दोन्हींचेही अनेक आरोग्य फायदे आहेत. ताक हे प्रोबायोटिक पेय आहे. हे आतड्यासाठी खूप चांगले आहे. हिंग, चिरलेली कोथिंबीर, पुदिना आणि दही वापरून बनवले जाते. हे एक अतिशय चवदार पेय आहे. शरीराची उष्णता कमी करण्यासाठी आपण ताकाचा आपल्या दररोजच्या आहारामध्ये समावेश करणे आवश्यक आणि फायदेशीर आहे.
नारळ पाणी
नारळ पाणी हे उन्हाळ्यातील एक उत्तम पेय आहे. उन्हाळ्यात याचे नियमित सेवन करावे. हे तुम्हाला हायड्रेटेड ठेवते. त्यामुळे किडनी स्टोन रोखण्यास मदत होते. तसेतर बाराही महिने नारळाच्या पाण्याचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. नारळाच्या पाण्यामुळे आपले त्वचा चांगली होण्यासही मदत होते.
जलजीरा
उन्हाळ्यात जलजीरा पिणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जलजीरा हे जिरे, आले, काळी मिरी, पुदिना आणि वाळलेल्या कैरीची पावडर वापरून बनवले जाते. या मसाल्यांमध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारखे अनेक पोषक घटक असतात. ते मळमळ, सूज आणि अपचन दूर करण्यासाठी कार्य करतात. त्यात पुदिन्याची पाने टाकल्याने उन्हाळ्यातही थंडावा मिळतो.
बेलाचा रस
उन्हाळ्याच्या हंगामामध्ये ऊर्जावान राहण्यासाठी बेलाच्या रसाचे सेवन करणे खूप जास्त फायदेशीर आहे. हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते आणि यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते. यामुळे कोलेस्टेरॉल आणि कॅन्सरचा धोकाही कमी होतो.
संबंधित बातम्या :
Hair | घामामुळे केस कोरडे आणि निर्जीव होऊ शकतात, हे टाळण्यासाठी या टिप्स फॉलो करा
Corona Cases : लहान मुलांना कोरोनाच्या नव्या लाटेचा मोठा धोका, जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात…