Summer | उन्हाळ्याच्या हंगामात जास्त प्रमाणात थंड पेय पिणे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक, वाचा!
असे म्हटंले जाते की आइस टीमुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो. तज्ज्ञांच्या मते, याच्या सेवनाने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू शकते. याव्यतिरिक्त यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण देखील वाढू शकते. जर तुम्हाला आइस टी खूप प्यायला आवडत असेल तर कमी प्रमाणात याचे सेवन करा. तुम्ही ते कमी प्रमाणात घ्या आणि मर्यादित प्रमाणात प्या.
मुंबई : लोक उन्हाळ्याच्या हंगामामध्ये (Summer) उष्णतेपासून बचाव करण्यासाठी अनेक पद्धती वापरतात. शरीराला आतून थंड ठेवण्यासाठी लोक अनेक उपाय करतात. त्यामध्ये प्रामुख्याने म्हणजे शरीर थंड ठेवण्यासाठी अनेक पेयांचा आहारामध्ये (Diet) समावेश करतात. तज्ज्ञांच्या मते, या गोष्टींमुळे काही काळ आराम मिळतो, पण त्यांचे काही तोटेही आहेत. तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात जास्त थंड पाणी किंवा थंड पेय प्यायल्याने पोटावरील चरबी बर्न होत नाही. त्यामुळे आपले वजन झपाट्याने वाढण्याची 100 टक्के शक्यता असते. यामुळे उन्हाळ्याच्या हंगामामध्ये जास्त थंड पाणी आणि पेय पिणे टाळाच. शिवाय जास्त थंड पेय (Cold drink) पिल्याने आरोग्यालाही अनेक समस्या निर्माण होतात, या समस्या नेमक्या कोणत्या आहेत. याबद्दल जाणून घेऊयात.
स्ट्रोक
असे म्हटंले जाते की आइस टीमुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो. तज्ज्ञांच्या मते, याच्या सेवनाने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू शकते. याव्यतिरिक्त यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण देखील वाढू शकते. जर तुम्हाला आइस टी खूप प्यायला आवडत असेल तर कमी प्रमाणात याचे सेवन करा. तुम्ही ते कमी प्रमाणात घ्या आणि मर्यादित प्रमाणात प्या.
झोपेची समस्या
ज्या लोकांना झोप येण्यास त्रास होतो किंवा झोपेशी संबंधित समस्या आहेत. त्यांनी कोणत्याही प्रकारे चहाचे सेवन टाळावे. चहामध्ये असलेले कॅफिन झोपेमध्ये अडथळा निर्माण करते. बऱ्याच लोकांना रात्रीच्या वेळी चहाचे सेवन करण्याची सवय असते. अशांनी ही आपली सवय लगेचच बदलावी. तसेच रात्रीच्या वेळी थंड पेय आणि पाणीही पिणे टाळाच.
वजन वाढण्याची शक्यता
आइस टीसाठी असे म्हटले जाते की ते वजन वाढवू शकते, ज्या लोकांना पूर्वीपेक्षा जास्त चरबीची समस्या आहे त्यांनी आइस टी पिऊ नये. तज्ञांच्या मते, काही लोक आईस टी वजन कमी करण्यासाठी पितात. मात्र, ते आपल्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाहीये. आइस टी वजन कमी करण्यास मदत करत नाही.
किडनी
आइस टीचे जास्त सेवन केल्याने किडनीचे आरोग्य बिघडते. यामुळे किडनी निकामी देखील होऊ शकते. आइस टी प्यायल्याने किडनीमध्ये खडे होऊ शकतात. जर तुम्हाला आधीच किडनीशी संबंधित कोणत्याही आजाराचा सामना करावा लागत असेल तर आइस टीपासून चार हात लांबच राहा.