Watermelon Juice : उष्णतेवर मात करण्यासाठी कलिंगडचा ज्यूस प्या, वाचा आरोग्य फायदे!
डिहायड्रेशनचा (Dehydration) त्रास उन्हाळ्याच्या हंगामात अधिक होतो. यामुळे आरोग्याची विशेष काळजी ही घ्यावी लागते. तज्ज्ञ सांगतात की, या हंगामामध्ये कलिंगड, ताक आणि फळांच्या ज्यूसचे (Juice) अधिक सेवन करून निरोगी राहिला हवे. हंगामामध्ये खूप घामही येतो.
मुंबई : डिहायड्रेशनचा (Dehydration) त्रास उन्हाळ्याच्या हंगामात अधिक होतो. यामुळे आरोग्याची विशेष काळजी ही घ्यावी लागते. तज्ज्ञ सांगतात की, या हंगामामध्ये कलिंगड, ताक आणि फळांच्या ज्यूसचे (Juice) अधिक सेवन करून निरोगी राहिला हवे. हंगामामध्ये खूप घामही येतो. यातून सर्व पाणी बाहेर येते, अशा स्थितीत तुम्ही पुरेसे पाणी सेवन करणे गरजेचे आहे. या हंगामामध्ये तुम्ही कलिंगडचे (Watermelon) सेवन अधिक करावे. याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यात भरपूर पोषक असतात. याचे सेवन तुम्ही ज्यूसच्या स्वरूपातही करू शकता. चला जाणून घेऊया कलिंगड खाण्याचे नेमके कोणते फायदे आपल्या शरीराला होतात.
कलिंगडच्या ज्सूसची रेसिपी
कलिंगडचे चौकोनी तुकडे, लिंबाचा रस, काळे मीठ, बर्फाचे तुकडे हे साहित्य प्रामुख्याने आपल्याला लागेल. कलिंगड कापून त्याच्या बिया काढा. हे ताजे कापलेले कलिंगड चौकोनी तुकडे ब्लेंडरमध्ये ठेवा. त्यात लिंबाचा रस घाला, चिमूटभर काळे मीठ आणि बर्फ घाला. आता मिश्रण करा. त्यानंतर हे काचेच्या ग्लासमध्ये काढा आणि थंडगार प्या. हे पेय फक्त चवदारच नसून आपल्या आरोग्यासाठीही अधिक फायदेशीर आहे.
कलिंगडचे फायदे
कलिंगडमध्ये 90 टक्के पाणी असते आणि ते शरीराला थंड ठेवण्याचे काम करते. यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असतात. कमी कॅलरीज असतात, यामुळे कलिंगडचे सेवन केल्याने आपले वजनही कमी होण्यास मदत होते. कलिंडमध्ये व्हिटॅमिन सी, ए आणि बायोटिनचा देखील चांगला स्रोत असतो. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. त्यात फायबर असते. हे पचनसंस्था निरोगी ठेवण्याचे काम करते. त्यामुळे बद्धकोष्ठता आणि गॅससारख्या समस्या दूर होण्यास मदत होते. हे शरीराला डिटॉक्स करते. कलिंगडमध्ये असलेले सिट्रालिन स्नायू दुखणे कमी करते.
संबंधित बातम्या :
दररोज सकाळी जिमला जाण्याचा येतो कंटाळा? मग हे उपाय करा आणि घरीच आपले वजन कमी करा!
Skin Care : महागड्या उत्पादनांपेक्षा कोरफडचा अशाप्रकारे वापर करा आणि सुंदर त्वचा मिळवा!