तुम्ही हर्बल चहाचं सेवन करता… मग थांबा!, ही बातमी अवश्य वाचा…

आरोग्यासाठी जास्त चहा हा हानिकारक आहे. अनेकांचा कल हा हर्बल चहाकडे वळला आहे. वजन कमी करण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी हर्बल चहा घेतला जात आहे. यर्बा मेट हर्बर चहामुळे कर्करोग होतो असं, एका रिपोर्टमधून समोर आलं आहे.

तुम्ही हर्बल चहाचं सेवन करता... मग थांबा!, ही बातमी अवश्य वाचा...
हर्बल चहा
Follow us
| Updated on: Feb 26, 2022 | 12:21 PM

मुंबई : चहा (Tea) हा सगळ्यांचा आवडचा विषय आहे. दिवसाची सुरुवात प्रत्येक घरात चहाने होते. चहा प्यायलाने ताजेतवाने वाटते. अगदी संध्याकाळीसुद्धा अनेकांना चहा लागतो. आपण कोणाकडे गेलो किंवा कोणी आपल्याकडे आलं तर आपण चहा घेणार का असं विचारतो. चहा हा भारतीयांच्या घरातील अविभाज्य घटक आहे. चहा प्यायला नाही तर अनेकांना अस्वस्थ वाटतं. अगदी अनेकांचं तर डोकं धरतं. आपण अनेक चहा प्रेमी पाहिले आहेत. त्यांना कधी पण चहा प्यायला आवडतो. वेळ काळ काही नसतो. बस एक गरम चाय की प्याली हो…चौकाचौकात चहाची अनेक दुकानं आपल्याला दिसतात. टपरीवरील चहा प्यायला तर मन तुप्त होतं. आरोग्यासाठी जास्त चहा हा हानिकारक आहे. अनेकांचा कल हा हर्बल चहाकडे वळला आहे. वजन कमी करण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी हर्बल चहा घेतला जात आहे. यर्बा मेट हर्बल चहामुळे (Yerba Matte Herbal) कर्करोग (Cancer) होतो असं, एका रिपोर्टमधून समोर आलं आहे.

यर्बा हा दक्षिण अमेरिकेतील लोकप्रिय चहा आहे. यर्बा मेट हा हर्बल चहा असून तो वनस्पतीच्या पानं आणि फांद्यापासून बनविला जातो. आयलेक्स पॅरोग्वेरेन्सिस असं या वनस्पतीचं नाव आहे. हा चहा प्यायल्याने वजन कमी करणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे असं अनेक प्रकारचे फायदे आहेत. मात्र हा चहा अधिक घेतल्याने कर्करोगाचा धोका वाढतो, असं एका संशोधनात समोर आलंय.

हा चहा कसा तयार करतात?

या हर्बल चहाची पाने विस्तवावर पहिले वाळवली जातात. मग गरम पाण्यात भिजवली जातात. हा चहा पिण्यासाठी खास झुकिनी नावाचा कंटेनर वापरला जातो. या कंटेनरमध्ये पानांचे तुकडे गाळण्यासाठी खालच्या बाजूला फिल्टर असतं.

या चहामध्ये तंबाखूसारखे PAH

या चहामध्ये तंबाखूसारखे PAH म्हणजे पॉलीसायक्लिक एँरोमॅटिक हायड्रोकार्बन्स नावाचे कार्सिनोजेन आढळते. हेच PAH तंबाखूमध्येही असतात. हा चहा प्यायल्याने फुफ्फुस, अन्ननलिका, पोट, स्वादुपिंड आणि यकृताचा कर्करोग होण्याची भीती आहे. कॅन्सर एपिडेमियॉजी बायोमार्कर्स अँड प्रिव्हेन्शन या जर्नलमधील संशोधनात ही शक्यता व्यक्त केली आहे.

100 सिगरेट येवढा धोका

यर्बा मेट चहा पिणे म्हणजे 100 सिगारेट पिण्याइतक्या धोका आहे, असं एका दुसऱ्या संशोधनात समोर आलं आहे. दक्षिण ब्राझिलमध्ये हा चहा प्यायला जातो. या चहामध्ये 200 मिली द्रव आणि दोन तृतीयांश यर्बा मेटची पानं भरलेली असतात. हा चहा प्यायल्यास आपल्या शरीरावर पाच सिगारेट पाकिटमधील बेंजो (A)पायरीन आढळून येतं.

अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका

यर्बा मेट चहा प्यायल्याने अन्ननलिकेचा कर्करोग होण्याची शक्यता आहे. दक्षिण अमेरिका देशांमध्ये हा चहा आवडीने प्यायला जातो. यूकेमध्ये अन्ननलिकेच्या कर्करोग झालेल्या 9 हजार 200 रुग्णांवर उपचार करण्यात आला आहे. तर दरवर्षी 7 हजार 900 रुग्णांचा कर्करोगामुळे मृत्यू झाला आहे, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

गरम चहा पिणे धोकादायक

गरम चहा प्यायल्याने थर्मल इंजरी होण्याची शक्यता असते, असं 2019मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात दिसून आलं आहे. कमी शिक्षण आणि पैसा असणारे लोकं जास्त प्रमाणात गरम चहा पितात. जर खूप गरम यर्बा मेट चहा प्यायल्याने कर्करोग होतो, हे सिद्ध करण्यासाठी कुठले ठोस पुरावे नाही. असं यूकेच्या कॅन्सर रिसर्चचे वरिष्ठ आरोग्य माहिती व्यवस्थापक निकोला स्मिथ यांनी म्हणं आहे. जर काही संशोधनात कर्करोग होत असल्याचं समोर आले असले तरी, तसा कुठलाही पुरावा नाही. अनेक ठिकाणी हा चहा बंद करण्यात आला आहे. काही किरकोळ विक्रत्यांकडे तो विकला जातो.

चहा पिण्यापूर्वी थंड करा

युनायटेड किंगडममध्ये कुठलंही गरम पेय कमी तापमानात प्यायलं जातं. चहा आणि कॉफी थोडी थंड झाल्यावर त्यात दूध घातलं गेलं पाहिजे, असं स्मिथ यांचं म्हणं आहे. असं केल्यास तुम्हाला कर्करोगाचा धोका कमी असतो.

टीप : या बातमीतील आरोग्यविषयक सल्ला प्राथमिक माहितीच्या आधारावर आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा.

संबंधित बातम्या

Beauty Care: चेहऱ्याची काळजी करताय? कडूलिंबासोबत या पदार्थांचा करा आवर्जून वापर, त्वचा नैसर्गिकरीत्या उजळून जाईल!

आई आणि बाळाच्या चांगल्या आरोग्यासाठी नारळ पाणी बेस्ट! जाणून घ्या गरोदरपणामध्ये नारळ पाणी पिण्याचे 10 फायदे

झटक्यात वजन कमी आटोक्यात आणायचंय? पाच प्रकारची पेय ठरतील उपयुक्त

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.