Health : उन्हाळ्यात आंब्यापासून बनवलेल्या या 4 स्वादिष्ट आणि आरोग्यदायी पेयांचे सेवन नक्की करा!
उन्हाळ्यात निरोगी (Healthy) राहण्यासाठी आरोग्याची काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्याच्याच हंगामामध्ये फळांचा राजा मार्केटमध्ये दाखल होतो. आंबा हे फळ जवळपास सर्वांनाच खाण्यासाठी प्रचंड आवडते. विशेष म्हणजे आंबा खाणे हे आपल्या आरोग्यासाठी (Health) देखील खूप जास्त फायदेशीर आहे.
मुंबई : उन्हाळ्यात निरोगी (Healthy) राहण्यासाठी आरोग्याची काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्याच्याच हंगामामध्ये फळांचा राजा मार्केटमध्ये दाखल होतो. आंबा हे फळ जवळपास सर्वांनाच खाण्यासाठी प्रचंड आवडते. विशेष म्हणजे आंबा खाणे हे आपल्या आरोग्यासाठी (Health) देखील खूप जास्त फायदेशीर आहे. उन्हाळ्याच्या हंगामात आंबा मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. हे एक हंगामी फळ (Fruit) आहे, जे उन्हाळ्यात येते. हे खूप चवदार आणि आरोग्यदायी आहे. आंब्यापासून तुम्ही अनेक प्रकारची पेये बनवू शकता. त्यांना बनवणे खूप सोपे आहे. हे पेय अतिशय चवदार असतात. ते शरीराला थंड ठेवण्याचे काम करतात. चला जाणून घेऊया तुम्ही कोणते पेय कसे बनवू शकता.
आंब्याचा रस
उन्हाळ्यात रस पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ते तयार करण्यासाठी आंबा सोलून त्याचे लहान चौकोनी तुकडे करा. आंब्याचे तुकडे, बर्फ, लिंबाचा रस आणि चवीनुसार साखर ब्लेंडरमध्ये टाका. त्याचे मिश्रण करा. हे मिश्रण चाळून घ्या. थंड सर्व्ह करा. हे पेय आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
कैरीचे पन्ने
उन्हाळ्यामध्ये कैरीचे अनेक प्रकारे सेवन केले जाते. कैरी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कैरीमुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते. कैरीचे पन्ने खाण्यासाठी अत्यंत चवदार लागते. पन्ने घरी तयार करण्यासाठी कुकरमध्ये कैरी ठेवा आणि चार ते पाच शिट्ट्या करा. त्यानंतर कैरी चांगली मॅश करून घ्या. साखर, भाजलेले जिरेपूड, चवीनुसार काळे मीठ घाला. थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये काही वेळ ठेवा आणि नंतर सर्व्ह करा.
मँगो आइस्ड
एका सॉसपॅनमध्ये आंब्याचे तुकडे, साखर आणि पाणी घाला. साखर विरघळल्यानंतर गॅसवरून उतरवा. आंबे मॅश करून बाजूला ठेवा. थंड झाल्यावर गाळून घ्या. सॉसपॅनमध्ये 6 कप पाणी आणि 10 ग्रीन टी किंवा ब्लॅक टी पिशव्या उकळण्यासाठी आणा. एका ग्लासमध्ये 4 चमचे आंब्याचे सरबत टाका आणि त्यात बर्फ घालून सर्व्ह करा.
आंबा लस्सी
आंब्याची लस्सी देखील खाण्यासाठी खूप जास्त चवदार असते. यासाठी ब्लेंडरमध्ये 1 कप चिरलेला आंबा, 1 कप साधे दही, 1 कप दूध, चवीनुसार साखर आणि बर्फाचे तुकडे घाला. लस्सी होईपर्यंत मिक्स करा. यानंतर त्यात सब्जा टाका आणि थंड करण्यासाठी काही वेळ ठेवा आणि सर्व्ह करा.
संबंधित बातम्या :
Health Care Tips : निरोगी राहण्यासाठी या 3 पदार्थांचा आहारात नक्कीच समावेश करा!
वजन कमी करण्यासोबतच आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर हा हर्बल चहा, जाणून घ्या ‘व्हाईट टी’बद्दल सविस्तर!