Calorie Deficit Diet : लठ्ठपणा कमी करण्यासाठी कमी कॅलरीयुक्त आहार घ्या, झटपट वजन कमी होईल

आपल्याकडे बहुतेक लोक वाढलेल्या वजनाच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. वाढलेले वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे कॅलरीचे प्रमाण नियंत्रित केले पाहिजे.

Calorie Deficit Diet : लठ्ठपणा कमी करण्यासाठी कमी कॅलरीयुक्त आहार घ्या, झटपट वजन कमी होईल
हेल्दी आहार
Follow us
| Updated on: May 29, 2021 | 9:56 AM

मुंबई : आपल्याकडे बहुतेक लोक वाढलेल्या वजनाच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. वाढलेले वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे कॅलरीचे प्रमाण नियंत्रित केले पाहिजे. आपल्याला कदाचित माहिती असेल की, जास्त कॅलरीयुक्त अन्न खाल्ल्याने चरबी वाढते. जर आपल्याला वजन कमी करायचे असेल तर आहारात प्रथिने, कमी कॅलरी, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिज पदार्थांचा आहारात समावेश करा. कॅलरी कमी असलेले नेमके कोणते पदार्थ आहेत, हे आपण बघणार आहोत. (Eat a low calorie diet to reduce obesity)

कॅलरी डेफिसिट डाएट

या डेफिसिट डाएटमध्ये आपल्याला कमी कॅलरी आहारात घ्यावा लागतील. या डाएटमध्ये कमी कॅलरी घ्यायच्या आणि जास्त कॅलरी बर्न करायच्या असतात. ज्यामुळे आपले वजन वेगाने कमी होण्यास मदत होते. यासाठी आपल्याला आहारात कमी कॅलरी घ्यावा लागतील.

पौष्टिक आणि कमी कॅलरी  

आपल्या आहारात बेरी, द्राक्षे, सफरचंद, खरबूज, ब्रोकोली, फुलकोबी, सोयाबीन, गाजर, बीट्स इ. समाविष्ट करा. या नैसर्गिक गोष्टी आहेत ज्या पौष्टिक असतात आणि त्यामध्ये कॅलरींचे प्रमाण देखील कमी असते. हे आपल्याला निरोगी ठेवते आणि वजन कमी करण्यास देखील मदत करते.

आहारात कडधान्याचा समावेश

गहू, सोया, बाजरी, ज्वारी, नाचणी, मुग, आणि ब्राऊड राईसचा आहारात समावेश केला पाहिजे. या कडधान्यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते. विशेष म्हणजे याचा समावेश आपल्या आहारात केल्यानंतर बराच काळ आपले पोट भरल्या सारखे वाटते.

भरपूर प्रथिने खा

प्रथिने समृध्द असलेल्या खाद्यपदार्थामध्ये कॅलरी कमी प्रमाणात असते आणि पोट बर्‍याच काळ भरल्यासारखे वाटते. याशिवाय प्रथिने स्नायू बनविण्यातही मदत करतात. पोहे, ओट्स, सोया, हरभरा, मूग, मसूर, अंडी इ आहारात घ्या.

जीवनशैलीत बदल करा

वजन कमी करण्यासाठी कमी कॅलरीयुक्त आहार घेतल्याने काहीही होणार नाही. आपल्या जीवनशैलीत बदल करून दररोज व्यायाम करावा लागेल. यामुळे आपली चरबी बर्न होण्यास मदत होईल.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!

Study | कोरोनाचा लैंगिक क्षमतेवर परिणाम, पुरुषांना होतोय ‘हा’ आजार

(Eat a low calorie diet to reduce obesity)

म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....