Weight Loss : झटपट वजन कमी करण्यासाठी ‘या’ भाज्या आणि फळांचा आहारात समावेश करा !
वजन कमी करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत आहे. मात्र, अनेक डाएट आणि व्यायाम करूनही वजन काही कमी होताना दिसत नाही. आज आम्ही तुम्हाला एक खास टिप्स सांगणार आहोत.
मुंबई : वजन कमी करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत. मात्र, अनेक डाएट आणि व्यायाम करूनही वजन काही कमी होताना दिसत नाही. आज आम्ही तुम्हाला एक खास टिप्स सांगणार आहोत. जे तुम्ही फाॅलो केल्यानंतर तुमचे वजन झटपट कमी होण्यास मदत होईल. विशेष म्हणजे यासाठी आपल्याला जास्त वेळ लागणार नाही. यासाठी फक्त आम्ही तुम्हाला सांगितलेल्या टिप्स फाॅलो कराव्या लागतील. (Eat this diet to lose weight)
दुधी भोपळा
वजन कमी करण्यासाठी दुधी भोपळा अत्यंत फायदेशीर आहे. त्याच्या सेवनाने शरीराला बरेच फायदे मिळतात. दुधी भोपळा हा फायबर समृद्ध आहे. ते खाल्ल्याने शरीरात पाण्याची कमतरता होत नाही. आणि आपल्याला बराच वेळ भूकही लागत नाही. दुधी भोपळ्यामध्ये शून्य चरबी असते, अशा परिस्थितीत त्यातून बनविलेले भाज्या, डाळ किंवा रस पिल्यास वजन कमी होण्यास मदत होईल.
शिमला मिरची
शिमला मिरचीचा आहारात समावेश करणे फायदेशीर आहे. शिमला मिरची चयापचय वाढविण्यात मदत करते. हे पाचक प्रणाली सुधारते. हे चरबी बर्न्स करते आणि वेदना कमी करण्यास मदत करते. विशेष म्हणजे शिमला मिरची वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. शिमला मिरची एंटी-ऑक्सिडेंट, अँटीइन्फ्लेमेटरी घटक आणि सल्फर, कॅरोटीनॉइड लाइकोपीन देखील असते. यामुळे कर्करोगासारख्या आजारांना टाळण्यासही फायदेशीर आहे.
काकडी
काकडी खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. काकडीमध्ये कॅलरी कमी असते. त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते. याशिवाय काकडी व्हिटॅमिन के, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम देखील समृद्ध आहे. काकडीमध्ये सिलिकॉन, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचे प्रमाण भरपूर आहे. हे तीन पौष्टिक घटक त्वचेसाठी आवश्यक आहेत. काकडी खाल्ल्याने त्वचा स्वच्छ होते. याशिवाय काकडीमध्येही जीवनसत्त्वे आढळतात.
कलिंगड
या हंगामात आपल्याला ताजे आणि थंड ठेवण्यासाठी कलिंगड अत्यंत फायदेशीर आहे. कलिंगडमध्ये 90 टक्के पाणी असते. त्यात फायबरचे प्रमाण जास्त आहे. यामध्ये कॅलरी कमी आहे. कलिंगड खाल्ल्याने तुम्हाला बर्याच वेळ पोट भरल्यासारखे वाटेल. कलिंगडमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडेंट लाइकोपीन देखील समृद्ध आहे. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
पालक
पालकामध्ये कॅलरी, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, रेशे असतात. पालकामध्ये खनिज लवण म्हणजे कॅल्शियम, फॉस्फरस, क्लोरिन, लोह आणि जीवनसत्त्व ए, बी, सी आणि इ भरपूर प्रमाणात असते. विशेष म्हणजे पालक खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच वाढलेले वजन कमी करण्यासाठी पालक अत्यंत फायदेशीर आहे. आपण आहारात पालकाचा समावेश केल्याने आपले वजन झटपट कमी होण्यास मदत मिळते.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Eat this diet to lose weight)