Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॅल्शियम युक्त ‘हे’ पदार्थ आपल्या आहारात समाविष्ट करा, होतील अनेक फायदे !

आपल्या शरीरातील 70 टक्के हाडे कॅल्शियम फॉस्फेटपासून बनलेली असतात. हेच कारण आहे की, कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

कॅल्शियम युक्त 'हे' पदार्थ आपल्या आहारात समाविष्ट करा, होतील अनेक फायदे !
Follow us
| Updated on: Apr 13, 2021 | 2:51 PM

मुंबई : आपल्या शरीरातील 70 टक्के हाडे कॅल्शियम फॉस्फेटपासून बनलेली असतात. हेच कारण आहे की, कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. बर्‍याच वेळा शरीरात कॅल्शियमची कमतरता भासते. शरीरातील कॅल्शियम वाढवण्यासाठी विविध आैषध उपचार देखील घेतले जातात. मात्र, आहारामध्ये काही गोष्टींचा समावेश करून आपण शरीरातील कॅल्शियमची पातळी वाढू शकतो. यासाठी आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. (Eating calcium rich foods is beneficial for health)

पनीर पनीर हे दुधापासून बनविलेले दुग्धजन्य पदार्थ आहे. जे आपल्या शरीरासाठी कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे. मोझरेला चीज विशेषतः कॅल्शियममध्ये जास्त असते आणि ते आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी चांगले असते. आरोग्याच्या परिणामासाठी आपण स्किम दुधापासून तयार केलेले पनीर देखील वापरुन शकता ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

दूध दररोज एक ग्लास दूध आपली हाडे मजबूत बनवते आणि तंदुरुस्त ठेवू शकते. लहानपणापासूनच हाडांची शक्ती आणि कॅल्शियमचे कार्यक्षम स्त्रोत यासाठी महत्वाचे आहे. मुलांनी सकाळी आणि रात्री एक ग्लास कोमट दूध प्यावे, विशेषत: झोपेच्या आधी.

अंडी अंडी आपल्या शरीरासाठी खूप लाभदायी आहेत. तसेच, त्यात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. अंडी उच्च गुणवत्तेच्या प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. अंड्यांमध्ये मुबलक प्रमाणत ‘व्हिटामिन डी’ आढळतो, जो तुमच्या हाडांना बळकटी देण्यास फायदेशीर ठरतो. अंडी सर्वोत्तम आणि आरोग्यासाठी उपयुक्त पदार्थांपैकी एक मानली जातात. अंड्यात कॅलरी, प्रथिने, निरोगी चरबी, फोलेट, कॅल्शियम, फॉस्फरस, सेलेनियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 5, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी 6 यासारखे पोषक असतात.

ब्रोकोली ब्रोकोलीमध्ये भरपूर पोषक घटक असतात. याव्यतिरिक्त, त्यात बरीच जीवनसत्त्वे देखील आढळतात. ब्रोकोली लोह, व्हिटामिन ए, सी, पोटॅशियम, प्रथिने, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट आणि क्रोमियमचा उत्कृष्ट स्रोत आहे. त्यात अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळतात. यात इंडोल्ड 3 कार्बिनॉल देखील आहे, जो शरीरातील अ‍ॅक्रेल हायड्रोकार्बन रिसेप्टर नावाच्या प्रोटीनला सक्रिय करतो. हे घटक आपल्या शरीरास कर्करोगापासून सुरक्षित ठेवतात.

(टीप : सेवानापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!

एकदा उकळवलेले दूध पुन्हा उकळवण्याची चूक करताय? होऊ शकते मोठे नुकसान!

(Eating calcium rich foods is beneficial for health)

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.