दही भात खाणे आरोग्यासाठी जबरदस्त फायदेशीर, वाचा…
अनेक लोकांना आपण पाहिले असेल की, त्यांना जेवनामध्ये दही भात खायला खूप आवडतो.
मुंबई : अनेक लोकांना आपण पाहिले असेल की, त्यांना जेवनामध्ये दही भात खायला खूप आवडतो. मात्र, हा दही भात खाण्यासाठी जेवढा चवदार आहे तेवढाच आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कारण दही भात खाण्यामुळे मेंदूचा काम करण्याचा वेग वाढतोच शिवाय आनंदी राहण्यासाठी मदत होते. यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे दही भात खाल्ल्याने आपले वजन देखील कमी होण्यास मदत होते. जे लोक वाढलेल्या वजनामुळे भात खाणे टाळतात. त्यांनी आजच आहारामध्ये दही भाताचा समावेश करा. चला तर मग जाणून घेऊयात दही भात खाण्याचे नेमके कोणते फायदे आपल्या शरीराला होतात. (Eating curd rice is very beneficial for health)
-दही भात खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
-ताप आल्यावर दही भात खाणे फायदेशीर ठरते. अनेकदा तापात काही खाण्याची इच्छा होत नाही. मात्र दही भात खाल्याने शरीराला भरपूर ऊर्जा मिळते.
-पोट बिघडल्यावर इतर पदार्थ खाण्यावर बंधन येतात. पण दही भाताने पोट शांत होते आणि ते पचण्यास देखील चांगले आहे.
-तुम्हाला जर बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर काही दिवस दही भाताचे सेवन करा. त्यात भरपूर प्रमाणात गुड बॅक्टेरीया असतात.
-दही भात खाल्ल्याने मूड देखील चांगला होतो.
-दही भात खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
-दररोज दही खाल्ल्याने उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो. त्याचबरोबर हृदयाशी संबंधित आजारांपासून दूर राहण्यासाठीही दही उपयुक्त आहे.
-केसांवर आणि त्वचेवर दही लावल्याने त्याचे चांगले परिणाम दिसू लागतात. डोक्यातील कोंडा टाळण्यासाठी केसांना दही लावणे फायदेशीर ठरते. यासाठी केसांना दही लावून अर्ध्या तासाने केस धुवावे.
संबंधित बातम्या :
सावधान! अपुरी झोप स्त्रियांसाठी घातक, कर्करोगासह ‘या’ गंभीर समस्यांना ठरेल कारणीभूत…
Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता
हंगामी सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय ‘काळीमिरी’, जाणून घ्या याचे महत्त्वाचे फायदे…https://t.co/pe3zkVHUt4#BlackPepper #health
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 25, 2020
(Eating curd rice is very beneficial for health)