Health Care Tips : रात्री उशीरा खाण्याची सवय आहे? मग या गोष्टी नक्कीच वाचा आणि वेळीच सवय बदला! 

बऱ्याच लोकांना रात्री (Night) झोपेमधून उठून काहीतरी खाण्याची सवय असते. त्यांना रात्री अचानकच भूक लागते. मात्र, आरोग्यासाठी हे अत्यंत धोकादायक आहे. आजकाल रात्री उशीरा जेवणाची फॅशन झाली आहे. परंतु ही सवय शरीरासाठी हानिकारक (Harmful) ठरू शकते.

Health Care Tips : रात्री उशीरा खाण्याची सवय आहे? मग या गोष्टी नक्कीच वाचा आणि वेळीच सवय बदला! 
रात्री उशीरा जेवण करणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 05, 2022 | 4:03 PM

मुंबई : बऱ्याच लोकांना रात्री (Night) झोपेमधून उठून काहीतरी खाण्याची सवय असते. त्यांना रात्री अचानकच भूक लागते. मात्र, आरोग्यासाठी हे अत्यंत धोकादायक आहे. आजकाल रात्री उशीरा जेवणाची फॅशन झाली आहे. परंतु ही सवय शरीरासाठी हानिकारक (Harmful) ठरू शकते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार योग्य वेळी अन्न (Food) न खाल्ल्याने शरीराच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. याचा सर्वात मोठा फटका म्हणजे आपले वजन झपाट्याने वाढण्यास सुरूवात होते. लठ्ठपणामुळे मधुमेह, संधिवात, उच्च रक्तदाब आणि इतर गंभीर समस्या एकाच वेळी निर्माण होतात.

हळूहळू खा

रात्री उशिरा जेवण झाल्यामुळे काही लोकांना झोपच लागत नाही. काही लोक तर रात्रीच्या जेवणामध्ये फास्ट फूड खातात. यामुळे फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. लोक पाच मिनिटांत किंवा त्याहून कमी वेळात अन्न खाऊन झोपतात. असे म्हणतात की अन्न कधीही खावे, ते हळूहळू आणि चघळल्यानंतरच खावे. आरामात बसून अन्न घेतल्याने चयापचय क्रियाही वाढते आणि पोटाचा त्रास होत नाही. तुम्हालाही रात्री फास्ट फूड खाण्याची सवय असेल तर आजपासूनच ती बदलायला सुरुवात करा.

जड अन्न खाऊ नका

कधी कधी लग्नात किंवा पार्टीत जड अन्न घेतले जाते. पण काही वेळा ते शरीराला तात्काळ हानीही पोहोचवते. परंतु रात्री उशिरा जड अन्न खाण्याची सवय आरोग्यासाठी हानिकारक आहे. रात्रीच्या वेळी शक्यतो खिचडी, दोन पातळ चपात्या भाज्यांसोबत खायला हवे. लक्षात ठेवा की या काळात सॅलड आपल्या प्लेटचा एक भाग असणे आवश्यक आहे.

झोपू नका

काही लोकांना रात्री उशिरा जेवण्याची सवय असते, तसेच ते जेवण झाले की, झोपण्याची चूक करतात. ही सवय एखाद्या मोठ्या चुकीपेक्षा कमी नाही. यामुळे लठ्ठपणा, मधुमेह, रक्तातील साखरेसारखे गंभीर आजार होऊ शकतात. अपचन, ऍसिडिटी आणि गॅस सारख्या पोटाशी संबंधित समस्या लोकांना त्रास देतात. त्याऐवजी अन्न खाल्ल्यानंतर थोडं चालत जा आणि मग झोपा.

संबंधित बातम्या : 

रमजामदरम्यान मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी खास तज्ज्ञांचे मार्गदर्शन, वाचा सविस्तरपणे!

Health care : रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी हे आहेत सर्वोत्तम उपाय, जाणून घ्या याबद्दल सविस्तर! 

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.