आंबा खाल्ल्याने वजन वाढतं? जाणून घ्या न्यूट्रिशनिस्टचे मत….
उन्हाळा सुरू होताच प्रत्येकजण आंब्याची आतुरतेने वाट पाहत असतो. आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी सोबतच कॉपर, झिंक, पोटॅशियमसारखे अनेक मिनरल्स असतात.
मुंबई : उन्हाळा सुरू होताच प्रत्येकजण आंब्याची आतुरतेने वाट पाहत असतो. आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी सोबतच कॉपर, झिंक, पोटॅशियमसारखे अनेक मिनरल्स असतात. जे आपल्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहेत. हापूस, तोतापूरी, पायरी, बदामी अशा विविध प्रकारातील आंबे चवीला जितके चांगली असतात तितकेच आरोग्यालाही पौष्टिक असतात. मात्र अनकेजण इच्छा असताना देखील आंबे खाणे शक्यतो टाळतात. (Eating magno can increases weight know the fact)
कारण लोकांना असे वाटते की, आंबा खाल्याने वजन वाटते त्यामुळे आंबे खाणे टाळतात. परंतू आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, खरोखरच आंबे खाल्याने वजन वाढते की नाही. जर आपण दररोज अमरस, मिल्कशेक्स, ज्यूस, आंबा मलई, आईस्क्रीम खाल्ले तर तुमचे वजन वाढू शकते. आंब्यात जवळपास 150 कॅलरीज असतात. जास्त कॅलरी खाल्ल्यास वजन वाढू शकते. म्हणून आंबे खाल्ल्यानंतर दुसरे काही खाऊ नये. असे केले तर तुमचे वजन वाढणार नाही.
आंबे खाण्याचे फायदे
-आंब्यामध्ये ए,बी आणि सी ही तिन्ही जीवनसत्वे असतात. याशिवायही आंब्यामध्ये शरीराला आवश्यक आणि वजन कमी करण्यास उपयुक्त असे अनेक घटक असल्याने उन्हाळ्यात हे फळ खायला पाहिजे.
-आंब्यात शर्करा असल्याने आंबा खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. उन्हामुळे थकल्यासारखे वाटत असल्यास तुम्हाला शक्ती आल्यासारखे वाटते. याशिवाय नुसता आंबा खाण्याऐवजी मॅंगो शेक किंवा कैरीचे पन्हे घेणेही अधिक फायदेशीर ठरु शकते.
-आंब्यामध्ये असणाऱ्या घटकांमुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यासाठी तसेच तुकतुकी कायम राहण्यासाठी आंबा उपयुक्त ठरतो.
-फिजिशियनच्यामते, एक सर्वसाधारण आकाराचा आंबा हा बटर किंवा बदामांपेक्षा अधिक पौष्टिक आहे. आंब्यामुळे शरीरातील नसा, टिश्यू व स्नायू मजबूत होतात. तसेच शरीर आतून स्वच्छ होते व रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
-‘व्हिटामिन बी6’ मुळे रक्तातील ‘होमोसेस्टीना’चे प्रमाण संतुलित राहते व हृद्यविकाराचा धोका कमी होतो.
-आंब्यात फायबर्सही मुबलक प्रमाणात असल्याने पोट साफ होण्यासही त्याची चांगली मदत होते.
-आंब्यात व्हिटॉमिन ए, आयर्न, कॉपर आणि पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक घटक असतात.
संबंधित बातम्या :
Health | देशातील 10 टक्के महिला PCODने ग्रासित, जाणून घ्या ‘या’ आजाराबद्दल…https://t.co/j8mizk9UJ9#PCOD #health
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 17, 2020
(Eating magno can increases weight know the fact)