फक्त 15 दिवस गहूऐवजी ‘या’ पिठाच्या खा चपाती, शरीरासाठी आहे फारच फायदेशीर

पोळी ऐवजी बाजरीची भाकरी खाल्ल्याने शरीराला फायदे होतात बाजरीच्या भाकरीमध्ये भरपूर पोषक तत्वे असतात आणि त्यामुळे अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.

फक्त 15 दिवस गहूऐवजी 'या' पिठाच्या खा चपाती, शरीरासाठी आहे फारच फायदेशीर
Follow us
| Updated on: Nov 15, 2024 | 7:30 AM

आजकालच्या आपल्या व्यस्त जीवनशैलीमुळे आणि खाण्यापिण्याच्या बदलत्या सवयीमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. मधुमेह, लठ्ठपणा, हृदयविकार असे अनेक आजार आपल्या जीवनावर परिणाम करता आहे. या समस्यांना तोंड देण्यासाठी आपल्याला आपल्या आहारात काही बदल करणे आवश्यक आहे. हा बदल तुम्ही तुमच्या पोळीनेही करू शकता.

आपण गव्हाच्या पिठापासून बनवलेली पोळी खातो पण त्याऐवजी बाजरीची भाकरी खाल्ल्याने शरीरात अनेक बदल दिसून येतात. सतत 15 दिवस सतत बाजरीची भाकरी खाल्ल्याने कोणते फायदे होतात ते जाणून घेऊ.

बाजरी हे एक सुपर फूड आहे. जे अनेक वर्षांपासून भारतात खाल्ले जाते. यामध्ये फायबर, प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. बाजरीत असलेले फायबर पचन संस्थेला निरोगी ठेवण्यास मदत करते आणि वजन कमी करण्यासही मदत करते.

बाजरीची भाकरी खाण्याचे फायदे

वजन कमी करते: बाजरीमध्ये जास्त प्रमाणात फायबर असते. त्यामुळे तुम्हाला बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते हे तुम्हाला जास्त अन्न खाण्यापासून प्रतिबंधित करते आणि वजन कमी करण्यास मदत करते.

रक्तातील साखर नियंत्रित करते: बाजरीमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स आहे. याचा अर्थ ते रक्तातील साखरेची पातळी हळूहळू वाढवते यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

पचनसंस्था निरोगी ठेवते: बाजरीत असलेले फायबर पचन संस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. त्यामुळे बद्धकोष्ठता ऍसिडिटी आणि अपचन सारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर: बाजरीत अँटिऑक्सिडंट असतात जे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. अँटिऑक्सिडंट केसांना चमकदार बनवण्यासाठी सुद्धा मदत करतात.

हृदयाचे आरोग्य सुधारते: बाजरीत असलेले मॅग्नेशियम रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात आणि हृदयविकाराचा धोका कमी करतात.

हाडे मजबूत करते: बाजरीमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असते. जे हाडे मजबूत करण्यास मदत करतात.

लक्षात ठेवा : बाजरी आरोग्यासाठी कितीही फायदेशीर असली तरीही बाजरी संतुलित आहाराचा एक भाग असावा. तुम्हाला काही शारीरिक समस्या असेल तर बाजरीचे सेवन करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.