Health Care : दररोज सकाळी मुठभर शेंगदाणे खा आणि आरोग्याच्या अनेक समस्या दूर करा

पोहे, उपमा विविध भाज्या यामध्ये शेंगदाणे टाकल्याशिवाय ती भाजी चवदार होत नाही. मात्र, तुम्हाला हे माहीती आहे का? की, शेंगदाणे फक्त अन्नाची चव वाढवण्यासाठीच नाहीतर आपल्या आरोग्यासाठी देखील खूप जास्त फायदेशीर आहेत.

Health Care : दररोज सकाळी मुठभर शेंगदाणे खा आणि आरोग्याच्या अनेक समस्या दूर करा
शेंगदाणे
Follow us
| Updated on: Jun 23, 2021 | 4:26 PM

मुंबई : पोहे, उपमा विविध भाज्या यामध्ये शेंगदाणे टाकल्याशिवाय चवदार होत नाही. मात्र, तुम्हाला हे माहीती आहे का? की, शेंगदाणे फक्त अन्नाची चव वाढवण्यासाठीच नाहीतर आपल्या आरोग्यासाठी देखील खूप जास्त फायदेशीर आहेत. शेंगदाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात विविध घटक असतात. ज्यामुळे आपल्या शरीराच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. दररोज सकाळी एक मुठभर तरी शेंगदाणे आपण खाल्ले पाहिजेत. (Eating peanuts every morning is beneficial for health)

दररोज सकाळी झोपेतून उठल्यावर अर्धा ग्लास पाणी प्या आणि त्यानंतर एक मुठभरून शेंगदाणे खा. यामुळे आपल्या आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. शेंगदाणे खाल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. शिवाय दात दुखी, पोटाचा इतर समस्या दूर होण्यास मदत होते. विशेष म्हणजे मासिक पाळीत जर आपण शेंगदाणे खाल्ले तर आपल्याला त्रास कमी होतो. यामुळे महिलांनी मासिक पाळीदरम्यान आहारात शेंगदाण्याचा समावेश करावा.

शेंगदाण्यात पोटॅशियम, मॅंगनीज, तांबे, कॅल्शियम, लोह, सेलेनियम इत्यादी अनेक पौष्टिक घटक आढळतात. जर आपण शेंगदाण्याबरोबर गुळाचे सेवन केले तर कंबर आणि सांधे दुखीमध्ये आराम मिळतो. तसेच, शरीरातील कॅल्शियमची कमतरता देखील दूर होते. त्यामध्ये उपस्थित अँटी-ऑक्सिडंट्स, लोह, फोलेट, कॅल्शियम आणि जस्त शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो. शेंगदाण्याचा सेवन रक्तातील साखर नियंत्रित करते. याद्वारे, आपण मधुमेहासारख्या आजारांपासून सुरक्षित राहू शकतात.

जर तुम्हाला शेंगदाण्यातील घटकांचा पुरेपूर फायदा घ्यायचा असेल, तर ते भिजवून ठेवा आणि मग खा. शेंगदाणे बर्‍याचदा हिवाळ्यामध्ये त्याच्या उबदार परिणामामुळेच खाल्ले जातात. परंतु, भिजलेली शेंगदाणे कोणत्याही ऋतूत खाऊ शकता. किमान पन्नास ग्रॅम शेंगदाणे दररोज रिकाम्या पोटी खा. यानंतर, सुमारे एक तासासाठी काहीही खाऊ नका. यामुळे आरोग्याच्या सर्व समस्या दूर होऊ शकतात.

संंबंधित बातम्या : 

Food | थंडीच्या दिवसांत आहारात ‘या’ गोष्टी समविष्ट करा आणि आजारांपासून दूर राहा!

Health | मधुमेहाची चिंता सतावतेय? या 5 पदार्थांचा आहारात समावेश करा आणि टेन्शन मुक्त व्हा!

(Eating peanuts every morning is beneficial for health)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.